कणकवली शहरातील लटकणाऱ्या वीज वाहक तारांना जोडणारे गार्ड बसविण्याचे काम चालू…

कणकवली : महावितरणकडून आज कणकवली शहरातील लोंबकळणाऱ्या वीज वाहक तारांना जोडणारे गार्ड बसविण्याचे काम आज सोमवारी ठिकठिकाणी चालू केले होते. हॉटेल हार्नबील ते भालचंद्र महाराज या रस्त्यासह अन्य ठिकाणी ही कामे चालू होती. आठवड्यापूर्वी कणकवली – टेंबवाडीतील पोलांवरील वीज वाहक तारांपैकी न्युट्रल तार तुटून पडल्याने वीजेचा २३० कि. वॅट दाबाचा वीज पुरवठा दुप्पट होऊन ग्राहकांची चालू असलेली विद्युत उपकरणे जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यामुळेच महावितरणने तारांना बांधून ठेवणारे गार्ड बसविण्याचे काम ठिकठिकाणी चालू केले.

You cannot copy content of this page