महायुतीत जे ‘आमदार’ तेच उमेदवार…

मंत्री दीपक केसरकर:नितेश राणें सोबत माझे चांगले संबंध ते मोठ्या फरकाने निवडून येतील..

⚡सावंतवाडी ता.१२-: महायुतीत ज्या ठिकाणी जे आमदार आहेत त्यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याचे घोषित झालेल आहे. अद्याप महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. कार्यकर्तांना नाराज करता येत नाही. राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. लवकरच उमेदवारांच्या याद्या जाहीर होतील. अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.तर मागीलवर्षीसह यावर्षीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातल ध्वजारोहण माझ्याहस्ते होणार आहे अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की आमदार नितेश राणे यांच्याशी माझे संबंध चांगले आहेत. ज्येष्ठत्वानुसार त्यांनी ते विधान केलं असेल. मात्र, महायुतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी सर्वांनीच एकत्र राहील पाहिजे हे मी सांगितलेल आहे. निश्चितच नितेश राणे मोठ्या फरकाने निवडून येतील. बाळासाहेब व नारायण राणे यांचं नातं वेगळं होतं. शिवसेनेशी त्यांची जवळीक राहीलेली आहे. राणेंची सुरुवातच शिवसेनेतून झालीय. त्यामुळे हे संबंध असेच कायम रहावे, त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांसोबत रहावं अशीच आमची भुमिका असणार आहे असं मत व्यक्त केले. जिल्ह्यातील महायुतीबाबत बोलण्यास केसरकरांच नेतृत्व पुरेसं आहे. आजूबाजूच्या नेत्यांना लुडबुड करू देऊ नका या नितेश राणेंच्या विधानाबाबत विचारलं असता ते बोलत होते.

You cannot copy content of this page