गांजा सेवन केल्याप्रकरणी तिघांना ताब्यात…

सावंतवाडी पोलिसांची कारवाई; महेश सारंगांकडून कारवाईबाबत पोलिसांचं कौतुक..

सावंतवाडी : शहरालगतच्या
कोलगाव येथे गांजा सेवन केल्याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले. यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. ही कारवाई सावंतवाडी पोलिसांकडून आज सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.

सापळा रचून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत महेश सरांग यांनी कौतुक केला.

You cannot copy content of this page