Headlines

Global Maharashtra Breaking News

वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान; मनसेने उपवनसंरक्षकांचे लक्ष वेधले..

⚡बांदा ता.०६-: सावंतवाडी तालुक्यातील मळगाव परिसरात गवे-रेड्यांचा वाढता उपद्रव लक्षात घेता तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली. याबाबत मनसेचे तालुका प्रमुख मिलिंद सावंत यांनी उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांना निवेदन सादर केले.निवेदनात म्हटले आहे की, मळगाव गावातील भरवस्ती तसेच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेल्या काही दिवसांपासून गवे-रेडे मोठ्या प्रमाणात वावरत असून भात पिकांसह…

Read Full News

गॅस सिलिंडर बुकिंगवरील ४५ दिवसांची अट रद्द करण्याची मागणी…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.. ⚡बांदा ता.०६-: घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंगसाठी लागू असलेली ४५ दिवसांची कालमर्यादा तातडीने कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.भाजपचे युवा मोर्चाचे सरचिटणीस जावेद खतीब यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले. श्रावण महिना आणि आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलिंडरची…

Read Full News

मोरगाव शाळेत रानभाजी प्रदर्शन व विक्री उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡बांदा ता.०६-:जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मोरगाव नं. १ येथे विद्यार्थ्यांमध्ये स्थानिक जैवविविधता, पारंपरिक आहारसंस्कृती आणि पौष्टिक रानभाज्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘रानभाजी प्रदर्शन व विक्री’ या उपक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले.या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरात आढळणाऱ्या विविध रानभाज्या संकलित करून त्यांचे आकर्षक प्रदर्शन मांडले. कुरडू, टाकळा, भारंगी, अळू, सुरण, फोडशी, करटुला, शेवगा अशा पावसाळी…

Read Full News

चेंदवण विद्यालयात येथे मुली व महिलांसाठीच्या कराटे प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡कुडाळ ता.०६-: माजी उपसरपंच सौ. रश्मी देवेंद्र नाईक यांच्या संकल्पनेतून चेंदवण गावात मुली व महिलांसाठी प्रथमच सेल्फ डिफेन्स (कराटे) प्रशिक्षण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. आजच्या काळात महिलांवर व मुलींवर वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर स्वसंरक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला.या प्रशिक्षणाचा शुभारंभ श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे शनिवारी सकाळी ९ वाजता करण्यात आला….

Read Full News

जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या रूग्ण कल्याण समितीवर सौ रश्मी नाईक यांची नियुक्ती

आमदार निलेश राणे यांची प्रतिनिधी म्हणून होणार कार्यरत.. ⚡कुडाळ ता.०६-: येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयमधील कार्यकारी मंडळ कार्यकारणी रुग्ण कल्याण समितीमध्ये मा. आमदार निलेश राणे यांची प्रतिनिधी म्हणुन सौ रश्मी देवेंद्र नाईक यांची नियुक्ती जिल्हा महिला रुग्णालय अधिक्षक यांनी केली आहे.कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री निलेश राणे यांनी पत्राद्वारे कुडाळ येथील जिल्हा महिला…

Read Full News

कुडाळ येथे १५ ऑगस्टला चेम्बर ऑफ कॉमर्सच्या नव्या कार्यालयाचे उ‌द्घाटन…

कोकणच्या औ‌द्योगिक विकासाला नवी दिशा:नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि भव्य उ‌द्योजक परिसंवाद.. ⚡कुडाळ ता.०६-: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर (MACCIA) या महाराष्ट्रातील उ‌द्योग, व्यापार व कृषी क्षेत्रातील अग्रगण्य आणि राज्य शासनमान्य सर्वोच्च उ‌द्योग संघटनेच्या वतीने दि. १५ व १६ ऑगस्ट २०२६ रोजी कुडाळ येथे दोन दिवसीय विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती…

Read Full News

आयुष ओपीडी सुरू करा; अन्यथा स्वातंत्र्यदिनी धरणे आंदोलन…

नगरसेवक देव्या सूर्याजी:५७ कोटींच्या नळपाणी योजनेच्या कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करून पाणीपुरवठा विभागातील कथित गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करा.. सावंतवाडी : आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या सावंतवाडी शहरात मंजूर झालेल्या ओपीडी संदर्भात नगरपरिषद प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे‌. तसेच ५७ कोटींच्या नळपाणी योजनेच्या कामात कसूर केलेल्या कंत्राटदाराला ब्लॅक लिस्ट करण्यासह पाणी पुरवठा विभागातील कथित गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांचे तात्काळ…

Read Full News

वेंगुर्ला भाजपातर्फे तहसीलदार ओंकार ओतारी यांचा सत्कार

वेंगुर्लाकोकण विभागात उत्कृष्ट कामगिरीबद्दल वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा वेंगुर्ला भाजपातर्फे विशेष सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते अलिबाग रायगड येथील महसूल दिनानिमित्त च्या कार्यक्रमाला कोकण विभागात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांना पुरस्कार…

Read Full News

वेत्येतील युवकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या…

सावंतवाडी : वेत्ये येथील राजन रामा गावडे (वय ४५) या युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. आज पहाटे घरात औषधाची दुर्गंधी येत असल्याने रूमचा दरवाजा ठोठावला असता प्रतिसाद येत नसल्याने दरवाजा तोडून पाहिले असता तो मृतावस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होत पंचनामा…

Read Full News

रॅगिंग केल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात; वाहन चालविताना वयाचे भान ठेवा…

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए. जी. देशिंगकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.. ⚡ओरोस, ता. ६ -: रॅगिंग हा केवळ विद्यार्थ्यांची चेष्टा-मस्करीचा प्रकार नसून त्याचा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि आत्मविश्वासावर गंभीर परिणाम होऊ शकतो. रॅगिंगमुळे विद्यार्थी नैराश्यात जाऊ शकतात, शिक्षण सोडण्याचा विचार करू शकतात, तर काही वेळा त्याचे गंभीर परिणामही होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रॅगिंगपासून दूर राहावे. तसेच…

Read Full News

You cannot copy content of this page