Global Maharashtra Breaking News

सामाजिक वनीकरणच्या वृक्ष लागवडीची चौकशी करा…

मनसेच्या सचिन तावडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. ओरोस ता २१शासनाची ३३ कोटी वृक्ष लागवड तसेच अन्य वृक्ष लागवड उपक्रम अंतर्गत जिल्ह्यात खोट्या नोंदी दाखवून शासनाचे लाखो रुपये सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लुटले आहेत. याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव सचिन तावडे यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना निवेदन…

Read More

विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या परजिल्ह्यातील वाहनांना रोखा…

मनसेच्या सचिन तावडे यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी.. सिंधुदुर्गनगरी ता २१सिंधुदुर्ग जिल्ह्यात परराज्यातील अवजड वाहने विनापरवाना विविध व्यवसाय करीत आहेत .तरी जिल्ह्यात बेकायदेशीरपणे फिरत असलेल्या वाहनांवर कारवाई करावी. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव सचिन तावडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा सचिव सचिन तावडे यांनी जिल्हा…

Read More

गेली दहा वर्षे खासदारकीचा वापर जनकल्याणासाठी केला…

खा विनायक राऊत:सिंधुदुर्गनगरी येथे प्रचार कार्यालयाचा शुभारंभ सिंधुदुर्गनगरी ता २१-:खासदारकीचा मिजास मिरविण्यापेक्षा खासदारकीचा वापर आपण गेली १० वर्षे जनकल्याणसाठी केला याचे आपल्याला समाधान आहे. २०१४, २०१९ नंतर आता २०२४ मध्येही आपला विजय निश्चित असून विरोधकांनाही ते माहीत आहे. त्यामुळे आपल्या विरोधात कमीत कमी मताने कोणता उमेदवार पडेल, याची चाचपणी विरोधक करत असल्याचा टोला खा विनायक…

Read More

सडूरे सोनधरणे येथे काजू बागेला भीषण आग…

अंदाजे ५० लाखांचे नुकसान:घटनास्थळी गटविकास अधिकारी आर. डी. जंगले यांनी भेट.. ⚡वैभववाडी ता.२१-: सडूरे सोनधरणे येथे काजू बागेला भीषण आग लागली. या आगीत काळे कुटुंबीयांच्या आंबा काजू बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु या आगीची तीव्रता एवढी भीषण होती. या आगी मध्ये पाच ते सहा बागा…

Read More

दिल्ली येथे विश्व साहित्य संम्मेलनात मालवणी कवितेचा डंका…

प्रा.नामदेव गवळी यांनी केले वाचन ; बालपणी बोलीने वेधले जगाचे लक्ष… ⚡सावंतवाडी ता.२१-: गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये स्थान मिळालेल्या नवी दिल्ली येथील विश्व साहित्य संमेलनात कारिवडे गावचे सुपुत्र कवी तथा प्रा डॉ नामदेव गवळी यांनी मालवणी बोलीत कविता वाचन करून पुन्हा एकदा मालवणी बोलीकडे जगाचे लक्ष वेधले. सहा दिवस आणि एकूण १९० सत्रात…

Read More

बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी बांदा येथे दोघे ताब्यात…

१९ लाखाचा मुद्देमाल जप्त :तपासणी नाक्यावर पोलिसांची कारवाई.. ⚡बांदा,ता.२१-: बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी बांदा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १० लाखाच्या दारूसह १९ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल रात्री उशिरा करण्यात आली. मोर्ला रवी चिट्ठी बाबू रवी व गुडीपुडी सुबराव साई कुमार (रा. पट्टी,आंध्र प्रदेश) अशी त्या दोघांची…

Read More

तळवडे येथे शेडला आग…

विशाल परब यांची घटनास्थळी भेट ; कृष्णाजी रेडकर यांना दिला धीर.. ⚡सावंतवाडी ता.२१-: काल मध्यरात्री दोनच्या सुमारास माजी सरपंच तळवडे श्री.कृष्णाजी पांडुरंग रेडकर यांच्या घरासमोरील शेडला अचानक आग लागली. काही किरकोळ नुकसान झाले होते. तळवडे येथील क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या युवा उद्योजक विशाल परब यांनी ही घटना समजताच घटनास्थळी भेट देत त्यांचे सांत्वन…

Read More

आपला देश म्हणजे ‘क्रिकेटची पंढरी’…

विशाल परब: भव्य ओव्हर आर्म टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा शुभारंभ.. ⚡सावंतवाडी ता.२१-: क्रीडा क्षेत्रातील अशा स्पर्धांच्या माध्यमातून नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळून त्यांचा आत्मविश्वास उंचावतो. आपला देश म्हणजे ‘क्रिकेटची पंढरी’. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाचा क्रिकेटचं भारी वेड. आपल्याकडे क्रिकेट नुसता पाहिला जात नाही तर त्याहूनही मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. क्रिकेटमधून आपण शारीरिक, मानसिक दृष्ट्या घडतो, तसेच…

Read More

करूळ येथे भरदिवसा घर फोडी…

पोलिसांची घटनास्थळी धाव:२ लाख ८१ हजार रुपयांचा ऐवज लंपास.. ⚡कणकवली ता.२०-: करुळ येथील घर फोडून सोन्याच्या दागिन्यांसह तीन हजार रोख रक्कम असे मिळून दोन लाख ८१ हजार रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला. ही घटना बुधवारी सकाळी ११ते २ वा. च्या सुमारास घडली. बुधवारी सकाळी ११ वा. च्या. सुमारास घर मालक हे काही कामानिमित्त घराबाहेर…

Read More

ऑल इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स असोसिएशन, सिंधुदुर्गचे वार्षिक अधिवेशन २२ मार्चला…

⚡सावंतवाडी ता.२०-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स, फॅमिली पेन्शनर्स, पोस्ट, बि. एस्. एनएल्. रेल्वे, आयकर, सेनादल, ब्यूरो आॅफ माईन्स,, शिपिंग, आकाशवाणी, दुरचित्रवाणी, सेंट्रल पोलीस फोर्स, भाभा अॅटोमिक रिसर्च, सेंट्रल एक्साईज आदी केंद्र सरकारच्या खात्यातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे वार्षिक अधिवेशन शुक्रवार दिनांक २२मार्च रोजी मातोश्री मंगल कार्यालय, कणकवली येथे संपन्न होणार असून या अधिवेशनासाठी एच. एफ….

Read More
You cannot copy content of this page