गणेश भक्तांसाठी आणखी एक रेल्वे…!

कणकवली : गणेशभक्त, चाकरमानी प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनातर्फे सातत्याने विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. यात आता मडगाव- पनवेल-मडगाव या एक दिवसीय गाडीची भर पडली आहे. या गाडीच्या ‘अप-डाऊन’ या दोन्ही फेऱ्या १५ सप्टेंबला सुटणार आहेत. मडगाव-पनवेल (०१४२८) सकाळी ९.३० वा. मडगाव येथून सुटेल व रात्री १०.१५ वा. पनवेल येथे पोहोचेल. पनवेल-मडगाव (०१४२७) रात्री ११.४५ वा. पनवेल येथून सुटेल व सकाळी ११ वा. मडगाव येथे पोहोचेल. गाडीला करमळी, थिविम, सावंतवाडी, झाराप, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव, वैभववाडी, राजापूर, विलंवडे, आडवली, रत्नागिरी, आदी स्थानकांवर थांबा आहे.

You cannot copy content of this page