⚡मालवण ता.०९-:
मसुरे गावचे सुपुत्र विजय जोशी उर्फ विजो यांच्या ‘टोपीवाले फुगे’ या बालकविता संग्रहाला ‘कवितेचे घर’ चंद्रपूर पुरस्कृत बापुरावजी पेटकर राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
सध्या महाराष्ट्राच्या काव्य प्रांतात अतिशय चर्चेचा विषय असलेल्या कवितेच्या घराच्या उपक्रमात नवनव्या व वैशिष्ट्यपूर्ण अशा उपक्रमांची भर पडत आहे. कवितेसाठी वाहिलेल्या शेगांव (बु.), त. वरोरा जि. चंद्रपूर येथील कवितेच्या घरात महाराष्ट्रातील बालसाहित्यिकांच्या दर्जेदार बालसाहित्याचा सन्मान होणार आहे.
या सन्मानार्थ जे पुरस्कार जाहीर करण्यात आले त्यामध्ये बापुरावजी पेटकर राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार मूळ मसुरे गावचे सुपुत्र आणि मुंबई डोंबिवली येथिल रहिवाशी विजय जोशी उर्फ विजो यांच्या ‘टोपीवाले फुगे’ या बालकविता संग्रहाला पुरस्कार जाहीर झाला आहे या पुरस्कारामध्ये तीन हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र यांचा समावेश आहे याबद्दल कवी विजो यांचे साहित्य क्षेत्राबरोबरच सर्वत्र कौतुक होत आहे
