देवगडात स्वच्छ माझे अंगण अभियानाला प्रारंभ…

देवगड प्रतिनिधी

       देवगडात सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात १ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात " स्वच्छ माझे अंगण " हे अभियान राबविण्यात येणार आहे . त्यामुळे देवगड तालुक्यातील सर्व कटूंबांनी या अभियानात सहभाग घ्यावा असे आवाहन गटविकास अधिकारी  देवगड वृक्षाली यादव यांनी केले आहे .
     स्वच्छतेची सवय अंगिकृत करण्यासाठी लोक चळवळ उभी करण्याचा निर्णय या मोहिमेच्या माध्यमातुन शासनाच्या मार्गदर्शनानुसार घेण्यात आला आहे . या पार्श्वभूमीवर शोष खड्डा / परसबाग / पाझर खड्डा , घनकचरा व्यवस्थापन  करिता कंपोस्ट खत खड्डा अथवा घरगुती खत खड्डा आणि कुटुंबस्तरावर कचराकुंडया अशा बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी हा त्याचा उद्देश आहे .
        या अभियान अंमलबजावणी कालावधीचे टप्पे याप्रमाणे अभियान कालावधी १/९/ २०२४ ते २५/९/ २०२४ ,पडताळणी कालावधी २६/९/ २०२४ ते ३०/९/ २०२४,पात्र कटूंबांना लेखी स्वरूपात निमंत्रण देणे०१/१०/ २०२४,प्रशस्तीपत्र वितरण  २/१०/ २०२४ असे कालावधी आहेत. या अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या कुटुंबांना श्रीफळ आणि प्रशस्तीपत्र देऊन ग्रामपंचायतच्या माध्यमातून सन्मानित करण्यात येणार आहे . त्यामुळे जास्तीस जास्त कुटूंबांनी सहभाग घ्यावा असे आवाहन गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांनी केले आहे .
You cannot copy content of this page