⚡मालवण ता.१०-:
ठाकरे शिवसेनेच्या युवती सेना सिंधुदुर्गच्यावतीने गौराई माझी लाडाची गं.. या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती युवतीसेना जिल्हाप्रमुख सौ. नीनाक्षी शिंदे- मेतर यांनी दिली.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपल्या घरी प्रतिष्ठापना केलेल्या गणपती व गौरी यांच्या सजावटीचा एक सेल्फी व एक व्हिडीओ काढून ९४२१९७११५९ या व्हॉटसअॅप नंबरवर आपले पूर्ण नाव व पत्ता यासह दि. १२ सप्टेंबरपर्यत दुपारी १२ वाजेपर्यत पाठवायचा आहे. यातील विजेत्यांना अनुक्रमे ५५५५, ४४४४, ३३३३ रूपये, सन्मानचिन्ह तसेच इतर सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ९४२१९७७१५९, ८६९८६०८३७४, ९३२५९४२७९८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही सौ. निनाक्षी शिंदे- मेतर यांनी केले आहे.
