Global Maharashtra Breaking News

जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आपच्या जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल…

⚡कणकवली ता.२२-: आपचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आप चे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांच्यासह ८ ते १० जणांच्या जमावाने शुक्रवारी दुपारी १ वा. च्या सुमारास कणकवली बुद्ध विहार येथे घोषणा देत निषेध केला. जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तसेच आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांच्यासह आदित्य बटवाले, मंगेश दळवी, मिलि…

Read More

वायरी येथे माडावरून पडून तरुण गंभीर जखमी…

⚡मालवण ता.२२-: मालवण वायरी मोरेश्वर वाडी येथील हार्दिक अंकुश ढोके (वय २५) हा तरुण माडावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. हार्दिक याला तातडीने मालवण शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर अधिक उपचारासाठी गोवा येथील रुग्णलयात हलविण्यात आले. वायरी मोरेश्वरवाडी येथे राहणारा हार्दिक ढोके हा माडावर चढायच्या मशीनच्या…

Read More

कोकणातील भाजपच्या पराजयात आम आदमी पक्षाचा मोठा हात असेल…

पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी व्यक्त केला विश्वास.. ⚡कणकवली ता.२२-:अरविंद केजरीवाल यांना भाजप प्रस्तुत सरकारच्या दबावाखाली ईडीने अटक केली असेल तरी त्यांच्या विचारांना कदापिही बंदिस्त करता येणार नाही. त्यांचे विचार पुढे घेऊन जात असताना कोकणात आगामी निवडणुकीत भाजपच्या पराजयात आम आदमी पक्षाचा मोठा हात असेल असे मत आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र…

Read More

एकपात्री अभिनय स्पर्धेत सीमा मराठे अंतिम फेरीत…

⚡वेंगुर्ला ता.२२-: महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहकार्याने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेमार्फत बोरिवली येथे घेण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या एकपात्री अभिनय स्पर्धेमधून वेंगुर्ला येथील साप्ताहिक किरातच्या संपादक सीमा शशांक मराठे यांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. फोटो – सीमा मराठे

Read More

निवडणूकीत पक्ष निधी मिळाला नाही हे केसरकरांनी देवाची शपथ घेऊन सांगावे…

विनायक राऊत ; मंत्रीपद मिळाले नाही म्हणून माझ्यावर आरोप करण्याचे काम. ⚡सावंतवाडी ता.२२-: दीपक केसरकर यांनी काजू शेतकऱ्यांना भाव वाढवून दिला नाही. बोंडूचा रस काढण्यासाठी मशिनी फुकट दिल्या. रस काढायला सुरू केल्यावर पोलीस दारात उभे राहीले.शरद पवारांशी बेईमानी करून आलेले केसरकर आपल्या तोंडाला पानं पुसणार हे उद्धव ठाकरेंना सांगितले होतं. अशी टीका खासदार विनायक राऊत…

Read More

दिल्लीत ४ जूननंतर पुन्हा पांढरी दाढी…

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास.. ⚡कुडाळ ता.२२-: आता आमचाही दशावतार सुरू झाला आहे. आज या मेळाव्यासाठी लोककलांमधील सर्वच जण उपस्थित आहेत. खासदारकीची निवडणूक लागली म्हणून येथे आलो असेल तर ते चूक आहे. कोरोना काळात या क्षेत्राला पालकमंत्री असताना मी सहकार्य केले आहे.कोरोना काळात अनेक चांगली माणसे गेली. त्यावेळी मी शब्द दिला होता…

Read More

पाणी मानव जीवनासाठी महत्वाचे…

संतोष कविटकर; तिलारी पाटबंधारे विभागाकडून जल सप्ताह.. सावंतवाडी ता.२२-: पाणी हे मानव जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे असुन पाण्याशिवाय जगणे हे जवळपास अशक्य गोष्ट आहे, भूपृष्ठावर उपलब्ध असलेल्या पाण्याचे परिमाण हे वापरणाऱ्याच्या तुलनेत अत्यंत अल्प असल्यामुळे या पाण्याचे संगोपन, संरक्षण, संवर्धन आणि अपव्यय हे आजच्या काळाची गरज बनली आहे असे प्रतिपादन तिलारी पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता संतोष…

Read More

मिलाग्रिस प्रशालेमध्ये आर्ट व क्राफ्ट प्रदर्शनाचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.२२-: सावंतवाडी तालुक्यातील मिलाग्रिस प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या अभिनव संकल्पनेतून चित्रकला व कार्यानुभव च्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरवले होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सावंतवाडी तालुक्यातील तहसीलदार सन्माननीय मोनिका कांबळे मॅडम उपस्थित होत्या. सर्वप्रथम प्रशालाचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाच्या…

Read More

कणकवली गणपती साना – जाणवली पुलाचे काम प्रगतीपथावर…

कार्यकारी अभियंत्यांकडून कामाची पाहणी.. ⚡कणकवली ता.२२-: कणकवली शहराला महामार्ग व ग्रामीण भागासाठी जोडणारा सोयीचा ठरणारा कणकवली गणपती साना – जाणवली पुलाचे काम गतीने सुरु आहे. १५ जून पर्यंत हे काम पूर्ण केलं जाणार आहे. कणकवली शहरात येणाऱ्या लोकांसाठी हा फुल महत्त्वाचा ठरणार आहे. या पुलाची रुंदी ७.५ मीटर असून उंची ६ मीटर आहे. दोन्ही साईटला…

Read More

ग्राम पंचायत निवडणूक भत्ता द्या…

मराठा समाज सर्वेक्षण रक्कमही अप्राप्त:प्राथमिक शिक्षक भारतीचे जिल्हा प्रशासनाला निवेदन.. ओरोस ता २२ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ मध्ये निवडणूक कर्मचारी यांना निवडणूक भत्ता मिळाला नसल्याचे प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग ने ७ मार्च २०२३, १५ मे २०२३ व ७ नोव्हेंबर २०२३ च्या निवेदनाद्वारे निदर्शनास आणून देण्यात आले होते. तसेच शासन परिपत्रकानुसार जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी सर्व तालुक्यातील तहसीलदार…

Read More
You cannot copy content of this page