Headlines

Global Maharashtra Breaking News

बांदा रोटरॅक्ट रायझिंग युथ क्लबचे कार्य ह सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदर्शवत…

निखिल चिंदक:पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न.. ⚡बांदा ता.१८-: समाजातील तळागाळातील सर्व घटकांपर्यंत पोहोचून समाजपयोगी काम करणाऱ्या बांदा रोटरॅक्ट रायझिंग युथ क्लबचे कार्य हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदर्शवत असून भविष्यात नवनवीन संकल्पना आत्मसात करून रोटरॅक्ट क्लबने समाजसेवेचा वारसा असाच निरंतर ठेवावा असे आवाहन रोटरॅक्ट क्लबचे सिंधुदुर्ग जिल्हा स्थापना अधिकारी निखिल चिंदक यांनी येथे केले. प्रमोद कामत म्हणाले कि,…

Read More

आषाढी एकादशी उत्सवासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर मित्रमंडळातर्फे आर्थिक देणगी…

⚡बांदा ता.१८-: बांदा विठ्ठल मंदिर येथील आषाढी एकादशी उत्सवासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर मित्रमंडळातर्फे आर्थिक देणगी देण्यात आली. याबाबतची माहिती भाऊ वाळके यांनी दिली. यावेळी मंदिराच्या वतीने ज्येष्ठ भजनकर्मी गिरीश महाजन यांनी देणगी स्वीकारली. यावेळी शिवसेनेचे सावंतवाडी तालुका प्रमुख नारायण राणे, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. अर्चना पांगम, सुशांत पांगम, भाऊ वाळके, माजी ग्रामपंचायत सदस्य…

Read More

कोकणच्या राजकीय पटलावरील “कोकणरत्न” म्हणजे दीपक केसरकर…

राजकीय वारसा नसतानाही नगराध्यक्ष ते कॅबिनेट मित्र पदापर्यंत मजल:मंत्री केसरकर यांच्यावर वाढदिवसा निमित्त सुरू आहे शुभेच्छांचा वर्षाव ⚡सावंतवाडी ता.१८-: कोणताही राजकीय वारसा नसताना स्वतःच्या हिमतीवर नगराध्यक्ष ते राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत मजल घेणारा नेता म्हणजे दीपक वसंतराव केसरकर. स्वतःच्या स्वकर्तृत्वावर सिद्ध केलेलं महायुती मधील ‘कोकणरत्न’. श्रद्धा अन् सबुरीच्या मार्गावर चालणाऱ्या या नेत्यानं आपल्या कार्यकर्तृत्वानं महाराष्ट्रासह जगभरात…

Read More

शिंदे सरकारचं ‘कोकणरत्न’ शिक्षणमंत्री दिपक केसरकर…

⚡सावंतवाडी ता.१८-: सावंतवाडी हे परमेश्वराला पहाटे पडलेले स्वप्न असेल, तर साक्षात परमेश्वराच्या स्वप्नाला प्रत्यक्षात साकारण्यासाठी तन-मन- धन अर्पण करून दिवस रात्र झटणारे शिल्पकार म्हणजे शिक्षणमंत्री मा.ना.श्री. दिपकभाई केसरकर. ३५० वर्षापूर्वीची परंपरा लाभलेल्या आणि पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज व शिवरामराजेंचा वारसा अभिमानाने सांगणाऱ्या सावंतवाडी शहराचे सभ्य, सुसंस्कृत व विनम्र स्वभाव असलेले शिंदे गटाचे प्रवक्ते महाराष्ट्र राज्याचे शिक्षण…

Read More

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

लहान गटात कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या कु. चिन्मय कोटणीस प्रथम तर मोठ्या गटात नेमळे हायस्कूलच्या कु. साक्षी मोहन दळवी प्रथम.. ⚡सावंतवाडी ता.१८-:सावंतवाडी येथील सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलने स्व.राजमाता सत्वशीलादेवी भोंसले यांच्या ६ व्या पुण्यस्मरणार्थ आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात सावंतवाडीच्या कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या कु. चिन्मय विक्रम कोटणीस (इ….

Read More

आषाढी एकादशीनिमित्त सावंतवाडी विठ्ठल मंदिरात विशाल परब यांनी घेतली दर्शन…

⚡सावंतवाडी ता.१७-: आज आषाढी एकादशी निमित्त सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिरात श्री देव विठ्ठल-रखुमाई चे मनोभावे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले. यावेळी समवेत माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, दिलीप भालेकर, केतन आजगांवकर, अमित गवंडळकर, नंदू उर्फ प्रसन्ना शिरोडकर आदी उपस्थित होते.

Read More

निलेशज राणे यांच्या माध्यमातून आपतग्रस्तांसाठी आर्थिक मदत…

कुडाळ – मालवण मधील अतीवृष्टीमध्ये नुकसान झालेल्याना केले आर्थिक सहाय्य.. ⚡ओरोस ता.१७-: कुडाळ तालुक्यात गेले काही दिवस चालू असलेल्या अतीवृष्टी व वादळ सदृश परीस्थींतीमुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या कुटुंबांना भारतीय जनता पक्षाचे कुडाळ – मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार सन्मा. श्री. निलेशजी राणे साहेब यांच्याकडून आर्थिक मदत सुपूर्द…

Read More

पटेल समाज आणि लायन्स क्लबच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण…

⚡मालवण ता.१७-: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेवताळे मालवण येथील विद्यार्थ्यांना पाटीदार (पटेल) समाज व लायन्स क्लब ऑफ मालवण यांच्या वतीने स्कूल बॅग तसेच अन्य शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटपही करण्यात आले. यावेळी पाटीदार समाजाचे शांती पटेल, अशोक पटेल, उर्मिला पटेल, बंशी पटेल, नयना पटेल यांसह लायन्स क्लबचे झोन चेअरमन विश्वास गांवकर,…

Read More

आषाढी एकादशी निमित्त कलमठ मधील श्री गणेश माँटेसरी च्या बलचमूंची वारकरी दिंडी…

⚡कणकवली ता.१७-: श्री गणेश माँटेसरी ने २१ वर्षांची परंपरा अखंडीत ठेवत या वर्षी सुध्दा त्याच उत्साहात ही भक्तिमय दिंडी संपन्न झाली. विठ्ठल – रुक्मिणी सह विविध संतांच्या वेशभूषेमध्ये बालचमू अगदी एकरूप झाले होते. तांबे भवन पासून सुरू झालेली दिंडी कलमठ बाजारपेठ विठ्ठल मंदिर इथे छोटासा सांस्कृतिक करून भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. पालकांनी सुद्धा उत्साहाने यामध्ये…

Read More

लायन्स क्लबच्या झोन चेअरमनपदी विश्वास गावकर यांची नियुक्ती…

⚡मालवण ता.१७-: मालवण लायन्स क्लबचे दोन वेळा अध्यक्षपद भुषवित ‘आऊटस्टैंडिंग प्रेसिडेंट’ यांसह अन्य अवॉर्ड प्राप्त करणाऱ्या ला. विश्वास गांवकर यांची लायन्स क्लब झोन चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी, कुडाळ, कणकवली आणि मालवण हे चार क्लब सेवाकार्य करणार आहेत. मालवण लायन्स क्लबच्या पदग्रहण कार्यक्रमात विश्वास गांवकर यांना इंटरनॅशनल मल्टिपल लायनची पिन देऊन…

Read More
You cannot copy content of this page