कामाला लागा, ही जागा भाजपलाच मिळणार…

भाजप जिल्हा चिटणीस महेश सारंग यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन, वेंगुर्लत भाजपची बैठक संपन्न

वेंगुर्ला

या मतदारसंघात आपली ताकद जास्त आहे. त्यामुळे ही जागा आम्हालाच मिळावी अशी आम्ही वरिष्ठांकडे मागणी केली आहे तरी तुम्ही सर्वजण एकजुटीने कामाला लागा ही जागा आपल्यालाच मिळणार आहे असे आवाहन भाजप जिल्हा चिटणीस महेश सारंग यांनी वेंगुर्ला येथील बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.

वेंगुर्ल्यातील भाजप प्रमुख पदाधिकाऱ्यांची पंचायत समिती वाईस बैठक संपन्न झाली. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व एकजुटीने भाजपला ही जागा मिळावी असा ठराव देखील यावेळी घेण्यात आला.

या बैठकीला जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी जिल्हा चिटणीस महेश सारंग, जिल्हा उपाध्यक्ष संजू परब आदी प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित.

You cannot copy content of this page