मालवण देऊळवाडा येथे पेव्हर ब्लॉक बसविणे कामाचा शुभारंभ…!

मालवण : (प्रतिनिधी)

मालवण शहर देऊळवाडा येथील श्री देव नारायण मंदिर ते श्री देव रामेश्वर मंदिर मार्गावर पेव्हर ब्लॉक बसविणे कामाचा शुभारंभ ग्रामस्थ शिवाजी म्हापणकर यांच्या हस्ते करण्यात आला.

या कामासाठी आमदार वैभव नाईक यांनी निधी उपलब्ध करून दिला. यासाठी सुहास वालावलकर, मनोज मोंडकर पुनम चव्हाण, उमेश चव्हाण नीना मुंबरकर, मोहन मराळ यांनी प्रयत्न केले, अशी माहिती देण्यात आली. या विकास कामाबाबत स्थानिक नागरिकांनी आभार मानले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, शहर प्रमुख बाबी जोगी, प्रसाद आडवकर, गणेश चव्हाण, भूषण म्हापणकर, गोपी मालवणकर, किशोर गावकर, महेश जावकर, प्रसाद चव्हाण, गोपी मालवणकर आदी देऊळवाडा ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page