जांभवडे गावात ५५ लाखाची विकासकामे मंजूर…

सरपंच अमित मडव यांनी मानले भाजप नेते निलेश राणे यांचे आभार..

कुडाळ, प्रतिनिधी

कुडाळ तालुक्यातील जांभवडे गावात जिल्हा नियोजन, जिल्हा वार्षिक योजनेतून विविध विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये ग्रा प. इमारत बांधणे, विस्तारीकरण करणे, राणेवाडी रस्ता डांबरीकरण करणे, जांभवडेकर वाडी पायवाट बांधणे, गव्हाण माळा स्मशान शेड बांधणे, बामणवाडी पायवाट बांधणे, मधलीवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, भूतवड आमव्हाळ सीडी वर्क करणे, चावटेश्वर मंदिर ते नाईकवाडी रस्ता करणे अशी विविध विकासकामे गावात मंजूर करण्यात आली असून यासाठी भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, तालुका अध्यक्ष दादा साईल यांनी लोरन्स मान्येकर प. स. बाळू मडव यांनी विशेष प्रयत्न केले. तर या सर्व कामासाठी सरपंच अमित मडव यांनी पाठपुरावा केला. या सर्व कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्धल सरपंच यांनी खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप नेते निलेश राणे यांचे विशेष आभार मानले.

You cannot copy content of this page