मळगाव शारदा विद्यालय शाळेच्यावतीने संदीप गावडे यांचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.१३सहदेव राऊळ-: मळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शारदा विद्यालय मळगाव शाळेला भाजप युवा नेते संदीप गावडे यांनी भेट देत सरस्वती देवीचे दर्शन घेतले. यावेळी शाळेच्यावतीने शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर यांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी मळगाव माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, पंकज पेडणेकर, शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष विवेक नार्वेकर, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त गावडे यांच्या माध्यमातून शारदा विद्यालय शाळेला सौर ऊर्जा संच भेट देण्यात आला होता. त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी शाळेच्यावतीने हा सत्कार करण्यात आला. यावेळी गावडे यांनी संपूर्ण शाळेची पाहणी केली.

You cannot copy content of this page