Headlines

Global Maharashtra Breaking News

महाराष्ट्र आणि जर्मनी यांच्यात झालेला करारानुसार सिंधुदुर्गातील युवक युवतींना मंत्री केसरकर यांच्या माध्यमातून नियुक्ती पत्रे प्रदान…

⚡सावंतवाडी ता.१५-: महाराष्ट्र शासन आणि जर्मनीतील बाडेन वाटेनबर्ग राज्य यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार जर्मन भाषा प्रशिक्षणार्थ्यांची पहिली तुकडी भोसले नॉलेज सिटी व बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था येथे प्रशिक्षण घेत आहे. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना जर्मन नोकरीची नियुक्तीपत्रे मान्यवरांच्या उपस्थितीत आज प्रदान करण्यात आली. याप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर, प्रधान सचिव कुंदन, राहुल रेखावार संचालक,…

Read Full News

कणकवली उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षकपदी विशाल रेड्डी…!

कणकवली : गेल्या वर्षभरापासून रिक्त असलेल्या कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदी डॉ. विशाल रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. विशाल रेड्डी यांनी यापूर्वी जिल्हा रुग्णालय येथे कार्यरत होते. तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्माधिकारी यांची कणकवली उपजिल्हा रुग्णालय बदली झाल्यावर हे पण गेल्या वर्षभर रिक्त होते त्यानंतर या पदाचा प्रभारी चार्ज डॉक्टर पंकज पाटील…

Read Full News

सिंधुदूर्ग वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन भाजपा शिष्टमंडळाने केले डॉक्टर व प्राध्यापकांचे अभिनंदन…!

⚡ओरोस ता.१५-: आज सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय येथे भाजपा पदाधिकाऱ्यांनी येथील कार्यरत डॉक्टर व प्राध्यापक यांची भेट घेत त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल अभिनंदन करत कुठल्याही राजकीय दबावाला बळी पडू नका, धमक्यांना घाबरू नका जनतेला अविरत सेवा द्या आम्ही आपल्या सोबत आहोत अश्या शब्दात धीर दिला. कालच उबाठा गटाकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ढोल वाजवत आंदोलन करण्यात…

Read Full News

रत्नागिरीच्या  त्या घटनेचा सकल हिंदू समाजाच्या वतीने कुडाळात निषेध मोर्चा…

कुडाळ : विजयादशमीच्या पूर्वसंध्येला  रत्नागिरीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काढलेली रॅली समाजकंटकांडून अडवण्यात आली आणि घोषणाबाजी करण्यात आली होती. त्या घटनेचे पडसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा उमटले. सकल हिंदू समामार्फत त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज कुडाळ शहरात मोर्चा काढण्यात आला. कुडाळ पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना आणि तहसीलदार कार्यलयात जाऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.      रत्नागिरीत विजयादशमी…

Read Full News

विशाल परब यांनी वाढदिवसानिमित्त बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला केली रुग्णवाहिका प्रदान…

⚡बांदा ता.१५-: भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. विशाल परब यांच्या हस्ते फीत कापून रुग्णावाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच बाळु सावंत, माजी सभापती…

Read Full News

मुलानेच केला आईचा खून…

कसाल येथील धक्कादायक घटना ⚡ओरोस ता १५-: बाजारात जाण्यावरून झालेल्या वादात मुलाने आईला हाताच्या थापटाने जोरदार मारहाण केली. त्याच्या हातून सुटका करून घेण्यासाठी अंगणातून रस्त्याच्या दिशेने धावताना अडकून गवतात पडलेल्या आईला विहिरीतून पाणी काढण्याच्या दोरीने गळा आवळून खून केल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी कसाल बौद्धवाडी येथे घडला आहे. या प्रकरणी मुलगा सुरेंद्र मोहन कदम (वय ४०)…

Read Full News

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून अणाव कुडाळ येथील निराधार महिलेला मदत…!

⚡सावंतवाडी ता.१५-: अणाव येथील भाग्यश्री कदम यांना सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान( सिंधुदुर्ग) यांच्या कडून मदतीचा भक्कम हात देत जीवनावश्यक वस्तू सहित आर्थिक मदत केली. श्रीमती भाग्यश्री कदम यांच्या पतीच्या निधनानंतर लहान मुलाच्या इयत्ता आठवी शिक्षणासाठी अणाव येथील रमाईनगर येथे रहात आहे. जि.प. सिंधुदुर्ग मध्ये ती सफाई कामगार म्हणून काम करत होती. काही कारणास्तव ती करत असलेले…

Read Full News

गावागावात निर्माण होणारी बुद्ध विहारे ही परिवर्तनवादी विचारांची व सामाजिक क्रांतीची केंद्रे बनली पाहिजेत…

भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक विजय हरकुळकर यांचे प्रतिपादन… वैभववाडी प्रतिनिधीभगवान बुध्दाची धम्मक्रांती ही रक्ताचा एकही थेंब न सांडता केलेली क्रांती असून धम्मचक्र गतिमान करायचे असेल तर तथागत बुद्धांनी सांगितलेल्या पंचशील व आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब केला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा ही बौद्धांची आचारसंहिता आहे. आपले शिलाचरण हीच आपली ओळख बनली पाहिजे….

Read Full News

विद्यार्थ्यांनी प्रलोभनांना बळी न पडता ध्येयावरती लक्ष केंद्रित करावे…

रामेश्वर विद्या मंदिर एडगाव शाळेचे मुख्याध्यापक चेतन बोडेकर यांचे प्रतिपादन… वैभववाडी प्रतिनिधीविद्यार्थ्यांनी सद्य परिस्थितीचा आढावा घेऊन शक्य तितक्या लवकर आपले ध्येय निश्चित करावे. त्यासाठी योग्य अभ्यासक्रमाची निवड करून त्याच मार्गावरून वाटचाल करावी, मध्येच येणाऱ्या प्रलोभनांना बळी न पडता ध्येयावरती लक्ष केंद्रित करावे.असे प्रतिपादन रामेश्वर विद्या मंदिर एडगाव शाळेचे मुख्याध्यापक चेतन बोडेकर यांनी केले.वैभववाडी तालुका धनगर…

Read Full News

डी..एड. बेरोजगारांच्या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा- इर्शाद शेख…

⚡ओरोस ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्हापरिषदे समोर जिल्ह्यातील डी.एड. बेरोजगार युवक व युवतीनी पुकारलेल्या बेमुदत आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. डी.एड. बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष श्री. फाले यांच्याशी चर्चा करून 7 ऑक्टोबर 2024 रोजी परिपत्रकात बदल करण्याच्या मागणी संदर्भात शिक्षण आयुक्तांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन आंदोलन करणाऱ्या डि.एड. बेरोजगाराना दिले. तसेच…

Read Full News

You cannot copy content of this page