⚡बांदा ता.१५-: भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. विशाल परब यांच्या हस्ते फीत कापून रुग्णावाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच बाळु सावंत, माजी सभापती शीतल राऊळ, ऍड. अनिल निरवडेकर, माजी सरपंच अक्रम खान, बाळा आकेरकर, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, आबा धारगळकर, शामसुंदर मांजरेकर, शहर अध्यक्ष बाबा काणेकर, सिद्धेश पावसकर, राकेश केसरकर, केदार कणबर्गी, निलेश कदम, सिद्धेश महाजन, गुरु कल्याणकर, समीर कल्याणकर, अक्षय परब, उदय येडवे, अक्षय मयेकर, निलेश देसाई, सुनील राऊळ, शैलेश केसरकर, सौ. श्रेया केसरकर, तनुजा वराडकर, रेश्मा सावंत, देवल येडवे, दीपलक्ष्मी सावंत-पटेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
उद्योजक रतन टाटा यांचे निधन झाल्याने विशाल परब यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. बांद्यात रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्याने भाजपा पदाधिकाऱ्यांनी आभार मानले आहेत.
विशाल परब यांनी वाढदिवसानिमित्त बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला केली रुग्णवाहिका प्रदान…
