कसाल येथील धक्कादायक घटना
⚡ओरोस ता १५-: बाजारात जाण्यावरून झालेल्या वादात मुलाने आईला हाताच्या थापटाने जोरदार मारहाण केली. त्याच्या हातून सुटका करून घेण्यासाठी अंगणातून रस्त्याच्या दिशेने धावताना अडकून गवतात पडलेल्या आईला विहिरीतून पाणी काढण्याच्या दोरीने गळा आवळून खून केल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी कसाल बौद्धवाडी येथे घडला आहे. या प्रकरणी मुलगा सुरेंद्र मोहन कदम (वय ४०) याला सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी अटक केली आहे. तर जन्म दिलेल्या मुलाच्या हातून खून झालेल्या दुर्दैवी आईचे नाव मनोरंजना कदम (वय ५८) असे आहे.
