सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून अणाव कुडाळ येथील निराधार महिलेला मदत…!

⚡सावंतवाडी ता.१५-: अणाव येथील भाग्यश्री कदम यांना सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान( सिंधुदुर्ग) यांच्या कडून मदतीचा भक्कम हात देत जीवनावश्यक वस्तू सहित आर्थिक मदत केली.

श्रीमती भाग्यश्री कदम यांच्या पतीच्या निधनानंतर लहान मुलाच्या इयत्ता आठवी शिक्षणासाठी अणाव येथील रमाईनगर येथे रहात आहे.

जि.प. सिंधुदुर्ग मध्ये ती सफाई कामगार म्हणून काम करत होती. काही कारणास्तव ती करत असलेले काम गेले. त्यातच मुलीचे लग्न करून दिले त्यासाठी खासगी वित्तीय संस्थांकडून तिने कर्ज घेतले होते. नोकरी गेल्याने तीची व तिच्या कुटुंबीयांवर ऊपासमारीची वेळ आली होती. वित्तीय संस्थांचाकडुनही कर्ज फेडीबाबत तगादा सुरू होता. पैसे कमावण्याचा दुसरा मार्गही नव्हता. कर्ज फेडायचे की कुठंबाचा चरितार्थ चालवायचा या द्वीधा मनस्थितीत भाग्यश्री कदम सापडली होती. याची माहिती तरुण भारतचे पत्रकार अरुण अणावकर यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे खजिनदार श्री. रवि जाधव यांच्याशी संपर्क साधून भाग्यश्री कदम यांच्या आर्थिक स्थितीची जाणीव करून दिली. श्री. रवि जाधव यांनी याची लागलीच दखल घेत आपल्या प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून अतिशय कमी कालावधीत किमान सुमारे दोन ते तीन महीने पुरेल एवढे सर्व प्रकारचे अन्नधान्य तसेच आर्थिक स्वरुपात सुमारे २७००/- रु.ची रोख रक्कम दिली. तसेच शासन स्तरावरून मिळत असलेल्या योजनांची माहिती सांगून त्याचा लाभ मिळून देण्यास प्रयत्न करू तसेच कुठंबासाठी हातभार लागावा म्हणून कुक्कुटपालनासाठी सुद्धा सहकार्य करणार असे संस्थेचे अध्यक्ष सतीश बागवे यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी सामाजिक बांधीलकी प्रतिष्ठान करत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल माहिती सांगताना प्रतिष्ठानचे पदाधिकारी म्हणाले की प्रतिष्ठान तर्फे सावंतवाडी शहरातच नव्हे तर अनेक गावागावांमध्ये निराधार व गरीब आजारी व्यक्तींची परिस्थिती जाणून घेऊन वस्तु व आर्थिक स्वरूपात मदत केली जाते.
त्याचप्रमाणे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी गरज असलेल्या वस्तु संस्थेकडून दिल्या जातात, तसेच समाजातील गरजा ओळखून सर्वतोपरी मदत केली जाते. शहरात काही घटना घडल्यास सामाजिक बांधिलकी तत्पर असते. अशा अनेक सामाजिक उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.
यावेळी प्रतिष्ठानने अध्यक्ष श्री. सतीशचंद्र बागवे, सचिव समिरा खलील, खजिनदार श्री. रवि जाधव, उपाध्यक्ष शैलेश नाईक, सदस्य रुपाली मुद्राळे,शरदिनी बागवे, हेलन निब्रे तसेच सावंतवाडी शहरातील दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे माजी नगरसेवक सुधीर आरिवडेकर यांनी मोलाची मदत केली तसेच विशाल पई, माजी नगरसेविका भारती मोरे, समाजसेविका सीमा मठकर, सविता टोपले या सर्वांनी मिळून जीवनावश्यक वस्तू स्वरूपात मदत केली याप्रसंगी. श्री. आमिन खलील व अणावचे माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. संतोष अणावकर व तरुण भारत पत्रकार अरुण आणावकर ऊपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून निराधार व गरजूंना जीवनावश्यक वस्तू संस्थेकडून व दानशूरकडून घेऊन त्या जीवनावश्यक वस्तू गरजूंपर्यंतर पोचवण्याचे काम संस्थेमार्फत केले जाते.
जर कोणाला निराधार गोरगरिबांना अन्नदान करायचं असेल तर त्यांनी सामाजिक बांधिलकीशी संपर्क साधावा आपले दान योग्यत्या गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही नक्कीच करू असे संस्थेचे रवी जाधव यांनी म्हटले आहे.
संपर्क
रवी जाधव. 9405264027
रूपा मुद्राळे 9422637971
समीरा खलील 8605936294

You cannot copy content of this page