रत्नागिरीच्या  त्या घटनेचा सकल हिंदू समाजाच्या वतीने कुडाळात निषेध मोर्चा…

कुडाळ : विजयादशमीच्या पूर्वसंध्येला  रत्नागिरीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काढलेली रॅली समाजकंटकांडून अडवण्यात आली आणि घोषणाबाजी करण्यात आली होती. त्या घटनेचे पडसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा उमटले. सकल हिंदू समामार्फत त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज कुडाळ शहरात मोर्चा काढण्यात आला. कुडाळ पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना आणि तहसीलदार कार्यलयात जाऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
      रत्नागिरीत विजयादशमी उत्सवावर झालेला हल्ला म्हणजे सकल हिंदू समाजावर झालेला हल्ला आहे. त्यामुळे त्या घटनेचा निषेध करण्याचे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले होते. आज सकाळी 10 वाजता जिजामाता चौकात सर्व हिंदू समाज बांधव जमा झाले. तिथून मोर्चाने सर्वजण कुडाळ पोलीस ठाण्यात धडकले. तिथे कुडाळ पोलिसांना निवेदन देण्यात आले. कुडाळचे निरीक्षक राजेंद्र सोनावणे यांनी निवेदन स्वीकारले.  त्यानंतर सर्वजण कुडाळ तहसीलदार कार्यालयाकडे रवाना झाले.  कुडाळ तहसीलदार कार्यालयात तहसीलदार विरसिंग वसावे याना निवेदन देण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
    तहसीलदार कार्यालयाच्या आवारात बोलताना मिलिंद देसाई यांनी रत्नागिरी घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला.स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी दिवशी झालेल्या संचालनामध्ये काही मुस्लिम बांधवांनी हे संचलन रोखण्याचा प्रयत्न केला आणि घोषणाबाजी केली सामाजिक तेढ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला अशांवर कारवाई झाली पाहिजे जर अशा प्रकारे घटना घडत असतील तर आम्ही हिंदू म्हणून गप्प राहणार नाही जशा तसे उत्तर देऊ असे त्यांनी यावेळी सांगितले.सकल हिंदू समाज अशा घटना सहन करणार नाही. प्रशासनाने अशा प्रवृत्तीला आळा घालावा अशी मागणी या निमित्ताने करण्यात आली.
     सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, कुडाळ शहरांमध्ये सध्या जाळीदार टोपी घातलेले अनेक अनोळखी तरुण युवक तसेच बुरखावेशधारी मोठ्या प्रमाणामध्ये फिरताना दिसत आहेत. त्याचबरोबर सध्या कुडाळ परिसरात लव्ह जिहादच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्यांच्या हालचालीवर लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे. सध्याची सामाजिक स्थिती अत्यंत संवेदनशील झालेली आहे. विशेषतः मुंबईतील इम्तियाज जलील यांच्या लाखोंच्या मोर्चानंतर आणि त्यातील आक्षेपार्ह घोषणानंतर समाजामध्ये एक प्रकारचा तणाव जाणवत आहे. त्यात ही घटना म्हणजे आगीत तेल ओतण्याचाच प्रकार आहे. यातील बेकायदा जमावावर व त्यातील लोकांवर अ‌द्याप पर्यंत कोणतीही कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. उलटपक्षी त्या हदंड माजवणार-या जमावातील काही व्यक्तींच्या तक्रारीवरून काही हिंदू युवकांना मात्र पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे दिसून येत आहे. हे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार आहे असे दिसून येते. या ठिकाणी ही बाब लक्षात घेतली पाहिजे की कोणा अन्य धर्मीयांच्या उत्सवामध्ये हिंदू धर्मीय युवक चाल करून गेले किंवा तेथे काही बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला असे घडलेले नाही. उलट पक्षी दरवर्षीप्रमाणे निघणा-या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनाला टारगेट करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केलेला आहे. लवकरच महाराष्ट्र विधान सभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत अशा स्थितीत कोणाची परीक्षा घेण्याच्या
उ‌द्देशाने मु‌द्दामहून जाणीवपूर्वक तणाव निर्माण करण्याचा तर प्रयत्न कोणी करत नाहीत ना? या दृष्टीने सुद्धा तपास होणे गरजेचे आहे.
    तसेच सध्या हिंदू धर्मियांचे अनेक सण, उत्सव, यात्रा, देवाच्या पालख्या सुरु होत आहेत व पुढेही होणा-या आहेत. त्यामध्ये कुडाळ तालुक्यातील हिंदू समाज मोठ्याप्रमाणामध्ये सामील होणारा आहे. हिंदू धर्मियांच्या या उत्सवामध्ये हेतूपुरस्सर विघ्न निर्माण करुन सामाजीक सलोखन बिघडविण्याचा प्रयत्न काही समाज कंटकांकडुन होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने आपण चहुबाजुने जागृत राहुन अशा घटना भविष्यात घडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी असे या निवेदनात म्हटले आहे.
     यावेळी भाजपाचे सरचिटणीस रणजित देसाई, वैद्य सुविनय दामले, मिलिंद देसाई, रमाकांत नाईक, प्रशांत धोंड, मंगेश नाडकर्णी, लवू म्हाडेश्वर, आनंद नाईक, विनय वर्दे, दीपलक्ष्मी पडते, विवेक पंडित, उदय कुडाळकर, शिवम म्हाडेश्वर, श्रीपाद तवटे, चांदणी कांबळी, रुपेश कानडे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page