Headlines

Global Maharashtra Breaking News

पणदूर प्राथमिक आरोग्य केंद्रात जनकल्याण समितीच नाही..

जि प सदस्य गंगाराम सडवेलकर यांची समिती स्थापनेची मागणी:अन्यथा स्वातंत्र्यदिनी उपोषणावर ठाम.. ⚡कुडाळ ता.१२-: तालुक्यातील पणदूर प्राथमिक आरोग्य केंद्रात अद्याप जनकल्याण समिती स्थापन करण्यात आलेली नसल्याने ती तातडीने स्थापन करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य तथा मतदारसंघ पिंगुळीचे सदस्य गंगाराम गणेश सडवेलकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. समिती स्थापन न केल्यास येत्या…

Read Full News

बॅ नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये अमली पदार्थविरोधी जनजागृती

अमली पदार्थांपासून दूर राहण्याचा विद्यार्थ्यांना संदेश कुडाळ : पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाणे आणि साईज फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने बॅरिस्टर नाथ पै शैक्षणिक भवन येथील बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये अमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अमली पदार्थमुक्ती, डायल 112 राष्ट्रीय आपत्कालीन हेल्पलाइन, महिला सुरक्षा आणि सायबर सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना…

Read Full News

सावंतवाडीतील तीन गाळे पालिकेकडून ‘सील’..

श्रेयश मुंज यांच्या तक्रारीची दखल:अनधिकृत व्यक्तींकडून गाळे वापरल्याचा ठपका ⚡सावंतवाडी ता १२-: लाभधारकांच्या ऐवजी अन्य व्यक्ती गाळे वापरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सावंतवाडी पालिका प्रशासनाने इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील तीन गाळे सील केले आहेत. सामाजिक कार्यकर्ते श्रेयश मुंज यांनी याबाबत पालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. याबाबत पालिकेचे कर विभागाचे अधिकारी गोविंद…

Read Full News

सावंतवाडीतील पाळणेकोंड धरणओव्हरफ्लो..

⚡सावंतवाडी ता.१२-: शहराला पाणी पुरवठा करणारे पाळणेकोंड धरण आज पहाटे ३.४५ वाजता पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे. धरणाचे सर्व सहाच्या सहा हायड्रोलिक दरवाजे ओव्हरफ्लो झाले असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. यंदा पावसाचे वेळापत्रक काहीसे कोलमडल्यामुळे धरणाची पाणीपातळी सुमारे एक मीटरने खाली होती. त्यामुळे शहरवासीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, गेल्या दोन…

Read Full News

चिमुकल्या स्वरांतून देशभक्तीचा जयघोष; बांदा नं. १ शाळेत देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा

बांदा/प्रतिनिधीस्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पीएमश्री जिल्हा परिषद केंद्र शाळा, बांदा नं. १ यांच्या वतीने अंगणवाडीतील ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांसाठी ‘चिमुकल्या स्वरांतून देशभक्तीचा जयघोष’ या देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेचे आयोजन गुरुवार दिनांक १३ रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून बालकांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या चिमुकल्या…

Read Full News

*एकच नारा, एकच नारा… हर घर तिरंगा, घर घर तिरंगा…

घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांची देशभक्तीचा संदेश देणारी जनजागृती रॅली.. ⚡बांदा ता.१२-: भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत व्हावी, तिरंग्याबद्दल आदर आणि अभिमान निर्माण व्हावा तसेच प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपीच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.हातात डौलाने फडकणारा तिरंगा आणि ओठांवर देशभक्तीपर घोषणांनी…

Read Full News

*बँकेमार्फत ‘आदर्श दूध सहकारी संस्था’ स्पर्धा आयोजन..

मनीष दळवी:प्रथम क्रमांकास ५० हजार, द्वितीय ३० हजार, तृतीय २० हजारांचे बक्षीस:जिल्ह्यात प्रतिदिन एक लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट.. ⚡सिंधुदुर्ग दि.१२-: जिल्ह्यामधील दूध उत्पादन वाढवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत विविध योजना राबवण्यात येत आहेत. सन २०१२ पासून गोकुळ (कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ) कोल्हापूर यांच्या मार्फत दूध संकलन सुरू झाले. सुरुवातीला ५०० लिटर दूध…

Read Full News

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर जिल्हास्तरीयकार्यशाळेचे श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये आयोजन…

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी व सकारात्मक अंमलबजावणी करा:मुंबई विद्यापीठ कुलगुरू प्रोफेसर रवींद्र कुलकर्णी.. ⚡सावंतवाडी ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे मुंबई विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त व मुंबई विद्यापीठ सिनेट…

Read Full News

यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये ‘ऑगस्ट क्रांती प्रेरणा महोत्सव’ उत्साहात…

जिल्हास्तरीय देशभक्ती कला स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡सावंतवाडी ता.१२-: ऑगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या वतीने जिल्हास्तरीय ‘ऑगस्ट क्रांती प्रेरणा महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर समूहगीत, समूह नृत्य व नाट्यछटा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील विविध मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी या स्पर्धेत…

Read Full News

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात ‘ड्युएल डिग्री’ची सुविधा…

सावंतवाडी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगाची (UGC) मान्यता असून मुक्त विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर पदवी ही इतर विद्यापीठाशी समकक्ष आहे. एक पदवी शिक्षणक्रम पूर्ण करताना अन्य शिक्षणक्रमांच्या माध्यमांतून आणखी एक पदवी अर्थात ड्युएल डीग्री मिळवीण्याची सुविधा या विद्यापीठाने उपलब्ध करून दिल्याची माहिती कोल्हापूर विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार प्रा. संजय थोरात…

Read Full News

You cannot copy content of this page