नगरपंचायत कचरा प्रश्नी भाजपा आक्रमक…
दोन दिवसात कचरा उचलला जाईल: मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी दिले आश्वासन.. ⚡देवगड ता.१३-: देवगड जामसंडे नगरपंचायत कचरा व्यवस्थापणामुळे नेहमीचं चर्चेत राहिली आहे .नगरपंचायत होऊन सात वर्षे पूर्ण झाली मात्र अद्यापही कायमस्वरूपी कचऱ्याचे व्यवस्थापन नगरपंचायत करू शकली नाही. नगरपंचायतीच्या कचरा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचा प्रयत्न करता करता मागील सत्ताधारी व विद्यमान सत्ताधारी यांच्या नाकीनऊ आलेले दिसत आहेत….
