सावंतवाडी मध्ये नवा ट्रेंड: उद्या जोरदार शक्तिप्रदर्शन करून विशाल परब उमेदवारी अर्ज दाखल करणार; युवकांमध्ये नवचैतन्य..
⚡सावंतवाडी ता.२७ प्रसन्न गोंदावळे-: विशाल परब यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल्यानंतर “सावंतवाडीत बदल हवा तर विशाल हवा” असा ट्रेंड सध्या ऐकायला मिळत आहे. त्यामुळे विशाल परब हे उद्या जोरदार शक्ती प्रदर्शन करून आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
दरम्यान विशाल परब यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचा जाहीर केल्यानंतर युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे . सद्याच्या घडीला विशाल परब यांच्या पाठीमागे युवा फळी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे विशाल परब यांचा आगामी निवडणुकीत फटका कोणाला बसतो की विशाल यांच्या रूपाने सावंतवाडीकरांना नवा आमदार मिळणार हे मात्र येणाऱ्या काळात ठरणार आहे परंतु सध्या विशाल परब हे उद्या जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
