⚡वेंगुर्ला ता.२७-: हॉस्पिटल नाका कला-क्रीडा मंडळाच्यावतीने दि. ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत हॉस्पिटल नाका येथे दिपावली शो टाईमचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त दि.३१ रोजी सायं. ६ वा. उद्घाटन, ७ वा. सिधुदुर्गची लावण्यवती २०२४ ही खुली लावणी नृत्य स्पर्धा (१२ वर्षापुढील), दि. १ नोव्हेंबर रोजी कुडाळ येथील चिमणी पाखरं डान्स अकॅडमीचा ‘जलवा २०२४‘ हा कार्यक्रम, सोबत ‘झी‘ मराठी ड्रामा ज्यनिअर टॉप ५ फायनलीस्ट आरव आईर याचा टीव्हीवरील अॅक्ट, दि. २ रोजी सकाळी श्रीसत्यनारायण महापूजा, सायं. ६ वा. वालावलकर दशावतार नाट्य मंडळ यांचा ‘कष्टभंजन मारूती‘ हा दणदणीत नाट्यप्रयोग, दि. ३ रोजी सायं. ६ वा. खास महिलांसाठी ‘होम मिनिस्टर-खेळ पैठणीचा‘ कार्यक्रम, यावेळी निवेदिका आणि अभिनेत्री मयुरी परब या उपस्थित राहणार आहेत. स्पर्धांच्या अधिक माहितीसाठी आणि संपर्कासाठी योगेश गोवेकर (९४०४३४४६७७) किवा करण निरावडेकर (७२४९८४९०२७) यांच्याशी संफ साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
