‘‘इस्रो वैज्ञानिक सहलीसाठी‘‘ विद्यार्थ्यांची निवड…

⚡वेंगुर्ला ता.२७-: उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील इयत्ता आठवीतील कु.प्राजक्ता अनिल भोकरे व कु.मयंक मोहन नंदगडकर या दोन विद्यार्थ्यांची इस्रो वैज्ञानिक सहलीसाठी निवड झाली आहे.

  इयत्ता सातवीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत यश मिळवलेल्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची या वैज्ञानिक सहलीसाठी  निवड केली जाते. यावर्षी या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांत प्राजक्ता भोकरे आणि मयंक नंदगडकर या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या निवडीबद्दल विद्यार्थ्यांचे न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विरेंद्र कामत-आडारकर, उपाध्यक्ष रमेश पिगुळकर, सचिव रमेश नरसुले, सदस्य निलेश मांजरेकर आणि इतर सर्व संस्था पदाधिकारी व मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती, पालक संघ यांनी अभिनंदन केले आहे.

फोटो – प्राजक्ता भोकरे, मयंक नंदगडकर

You cannot copy content of this page