⚡मालवण ता.२७-: आरक्षित व ओबीसी समाज महासंघाच्या मालवण तालुकाध्यक्षपदी रविकिरण तोरसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती आरक्षित व ओबीसी समाज महासंघाचे पदाधिकारी नितीन वाळके, नंदन वेंगुर्लेकर यांनी दिली.
२४ ऑक्टोबर रोजी झालेल्या आरक्षित व ओबीसी समाज महासंघाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी नंदन वेंगुर्लेकर, रमण वायंगणकर, सुनील भोगटे, काका कुडाळकर, दिपलक्ष्मी पडते, महेश परुळेकर, चंद्रकांत कुंभार आदी उपस्थित होते.
आरक्षित व ओबीसी समाज महासंघ सिंधुदुर्ग ही संघटना सिंधुदुर्गातील ओबीसी व आरक्षित समाजाच्या हितासाठी आणि हक्कांसाठी कार्यरत आहे. आजमितीस सिंधुदुर्गातील जवळपास सर्व धर्मातील साठच्या आसपास समाज महासंघाशी निगडित आहेत. आरक्षित व ओबीसी समाजाला राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्र, प्रशासन यामध्ये न्याय वाटा मिळावा या दृष्टिकोनातून महासंघ कार्यरत आहे. महासंघांच्या कार्याचा विस्तार तसेच समाज बांधवांना त्यांच्या हक्का संदर्भात जनजागृती करण्यासाठी संघटनात्मक महासंघ बांधणी करत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या संघटनात्मक बांधणीमध्ये सहभाग असावा या हेतूने रविकिरण तोरसकर यांची मालवण तालुक्याच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
