Headlines

Global Maharashtra Breaking News

बांदा पोलीस आणि दंगल नियंत्रक पथकाचा आगामी सण-उत्सवांसाठी शहरात रूटमार्च…

बांदा, प्रतिनिधी:आगामी गणेशोत्सव व इतर सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बांदा पोलीस ठाणे आणि दंगल नियंत्रक पथक यांच्या संयुक्त विद्यमाने बांदा शहरात रूटमार्च काढण्यात आला. शहरातील बाजारपेठ, मुख्य चौक, गर्दीचे ठिकाणे तसेच संवेदनशील भागातून या रूटमार्चने मार्गक्रमण केले. रूटमार्चचा उद्देश नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढवणे आणि कायदा हात घेणाऱ्या समाजकंटकांना प्रतिबंध करणे हा होता….

Read Full News

रोट्रॅक्ट क्लब बांदाच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

बांदा/प्रतिनिधीरोट्रॅक्ट क्लब बांदाच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. आगामी वर्षासाठी अध्यक्षपदी डॉ. मिताली सावंत, सचिवपदी संकेत वेंगुर्लेकर, तर खजिनदारपदी मयूर मसुरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपल्या पदाची सूत्रे अधिकृतपणे स्वीकारली.रोट्रॅक्ट क्लब बांदाने मागील वर्षभरात ८५ हून अधिक यशस्वी सामाजिक प्रकल्प राबवून सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. विविध सामाजिक…

Read Full News

बांदा पंचक्रोशीतील वीज समस्या सोडविण्यासाठी महावितरणला वूड कटर..

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची महावितरण कार्यालयाला भेट; वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा.. ⚡बांदा ता.२०-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांनी आज सकाळी महावितरणच्या बांदा कार्यालयाला सदिच्छा भेट देत बांदा पंचक्रोशीतील वीजपुरवठ्याच्या विविध समस्यांची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी सहाय्यक अभियंता वैष्णव कांबळे व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा…

Read Full News

इन्सुली महामार्गावरील खड्डे अखेर बुजविले..

जि.प. सदस्य नितीन राऊळ यांच्या पाठपुराव्याला यश; कोठावळेबांध, माडभाकर व डोबवाडीतील रस्त्याची दुरुस्ती सुरू.. ⚡बांदा ता.२०-: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील इन्सुली परिसरातील कोठावळेबांध, माडभाकर व डोबवाडी भागात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी ग्रामस्थांच्या तक्रारीची तत्काळ दखल घेत संबंधित महामार्ग विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने…

Read Full News

सावंतवाडीत आयुर्वेद ओपीडीचा मार्ग मोकळा…

देव्या सूर्याजी यांच्या आंदोलनाला यश; दोन महिन्यांत मोफत आरोग्यसेवा सुरू होणार.. सावंतवाडी : केंद्र सरकारच्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा यांना बाह्यरुग्ण विभाग‌ (ओपीडी) चालू करण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषद व अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान यांच्यामध्ये होणा-या सामंजस्य कराराच्या मसु‌द्याला आज मान्यता देण्याबाबत सभागृहात मंजूरी देण्यात आली. यासाठी नगरसेवक तथा उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आमदार…

Read Full News

*आंबोलीत “ड्रिंक अँड ड्राईव्ह” तपासणी केंद्र उभारा…

सरपंच सौ. सावित्री पालेकर: ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याची केली मागणी.. ⚡सावंतवाडी,ता.२०-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या आंबोली येथे राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे कायमस्वरूपी मद्यपान तपासणी केंद्र आणि ट्रॉमा केअर सेंटर तातडीने उभारावे, अशी मागणी ग्रामपंचायत सरपंच सौ.सावित्री पालेकर आंबोलीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याकडे केली आहे. निवेदनात म्हटले…

Read Full News

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचा संकल्प करावा…

सुनील राऊळ:संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त कुणकेरी विद्यालयात पर्यावरण संवर्धन व करिअर मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना १०० सुपारी रोपांचे वाटप.. ⚡सावंतवाडी, ता. २०-: विद्यार्थ्यांनी स्वतःला कधीही कमजोर समजू नये. आपल्यामध्ये काहीतरी करण्याची जिद्द आहे, असा आत्मविश्वास बाळगून दहावी-बारावीच्या काळातच भविष्यात काय करायचे, याचा संकल्प करावा. ध्येय निश्चित करून त्या दिशेने सातत्याने वाटचाल केल्यास विद्यार्थी भविष्यात यशाचे शिलेदार बनतील,…

Read Full News

गणेशोत्सवापूर्वी बाजारपेठेतील रस्त्यांची डागडुजी…

दोन दिवस मुख्य बाजारपेठेतील वाहतूक बंद; नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी केली कामाची पाहणी.. ⚡सावंतवाडी, ता. २०-: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य बाजारपेठेत होणारी नागरिकांची व व्यापाऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन नगरपालिका प्रशासनाने रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम वेगाने सुरू असून, या कामासाठी दोन दिवस बाजारपेठेतील वाहतूक बंद ठेवण्यात…

Read Full News

कणकवलीतील मोकाट गुरे, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त होणार…

कणकवली : शहरातील मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांचा नागरिकांना होणारा उपद्रव लक्षात घेता कणकवली नगरपंचायतीने या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे काम सुरू असून, लवकरच कुत्रे पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याची मोहीम व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली. कणकवली येथील गोपुरी आश्रम येथे गोपुरी आश्रमच्या पदाधिकाऱ्यांची…

Read Full News

५९ व्या युवा महोत्सवात एस.आर.एम.महाविद्यालयाचे सुयश

कुडाळ : युवकांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी आणि व्यक्तिमत्त्व उंचावण्यासाठी युवा महोत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. नेहमी प्रमाणे यावर्षीही संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवात एकोणीस विविध कलाप्रकारांत सहभाग घेऊन त्यापैकी अकरा कलाप्रकारांत प्राथमिक स्पर्धेत सुयश मिळवत मुंबई येथे संपन्न होणाऱ्या ५९ व्या युवा महोत्सवाची अंतिम फेरी गाठली आहे.यशवंतराव भोसले…

Read Full News

You cannot copy content of this page