Headlines

बांदा पोलीस आणि दंगल नियंत्रक पथकाचा आगामी सण-उत्सवांसाठी शहरात रूटमार्च…

बांदा, प्रतिनिधी:
आगामी गणेशोत्सव व इतर सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बांदा पोलीस ठाणे आणि दंगल नियंत्रक पथक यांच्या संयुक्त विद्यमाने बांदा शहरात रूटमार्च काढण्यात आला.

शहरातील बाजारपेठ, मुख्य चौक, गर्दीचे ठिकाणे तसेच संवेदनशील भागातून या रूटमार्चने मार्गक्रमण केले. रूटमार्चचा उद्देश नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढवणे आणि कायदा हात घेणाऱ्या समाजकंटकांना प्रतिबंध करणे हा होता.

पोलिसांनी नागरिकांना सण शांततेत आणि बंधुभावाने साजरा करण्याचे आवाहन केले. तसेच कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये, संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे सांगण्यात आले.

या रूटमार्चमध्ये बांदा पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आणि दंगल नियंत्रक पथकातील जवान सहभागी होते.

सणांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून कडक गस्त आणि तपासणी सुरू ठेवण्यात येणार असल्याचे बांदा पोलिसांनी सांगितले.

You cannot copy content of this page