Headlines

रोट्रॅक्ट क्लब बांदाच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

बांदा/प्रतिनिधी
रोट्रॅक्ट क्लब बांदाच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. आगामी वर्षासाठी अध्यक्षपदी डॉ. मिताली सावंत, सचिवपदी संकेत वेंगुर्लेकर, तर खजिनदारपदी मयूर मसुरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपल्या पदाची सूत्रे अधिकृतपणे स्वीकारली.
रोट्रॅक्ट क्लब बांदाने मागील वर्षभरात ८५ हून अधिक यशस्वी सामाजिक प्रकल्प राबवून सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्यासह समाजोपयोगी कार्यात क्लबने उल्लेखनीय योगदान दिले.
यावेळी बोलताना प्रणय तेली म्हणाले, “रोट्रॅक्ट बांदाचे काम अत्यंत वाखाणण्याजोगे आणि समाजाला दिशा देणारे आहे. तरुण रोट्रॅक्टर्सच्या धडपडीमुळे बांदा परिसरातील अनेक गरजूंना वेळेवर मदत मिळाली असून, समाजासाठी ही युवाशक्ती खऱ्या अर्थाने वरदान ठरत आहे.”
विभाग अध्यक्ष अमेय वरेरकर यांनीही रोट्रॅक्ट क्लब बांदाच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “क्लबच्या स्थापनेपासूनच्या मागील दोन वर्षांतील रोट्रॅक्ट बांदाची उत्तुंग भरारी कौतुकास्पद आहे. क्लबच्या गतिमान कामामुळे ३१७० विभागातील नव्याने स्थापन झालेल्या इतर क्लबनाही मोठी प्रेरणा मिळत आहे.”
कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विभाग अध्यक्ष अमेय वरेरकर, नवनिर्वाचित अध्यक्ष मिताली सावंत, सचिव संकेत वेंगुर्लेकर, खजिनदार मयूर मसुरकर, माजी अध्यक्ष रोहन कुबडे, सिंधुदुर्ग झोन अध्यक्ष निकिता अराबेकर, बांदा रोटरी अध्यक्ष स्वप्नील धामापूरकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेहेक शेख यांनी केले. संकेत वेंगुर्लेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
फोटो:-
बांदा येथे रोट्रॅक्ट क्लबचे नूतन पदाधिकारी व उपस्थित असलेले मान्यवर. (छायाचित्र- नीलेश मोरजकर)

You cannot copy content of this page