Headlines

Global Maharashtra Breaking News

आंबोली जंगलात सशाची शिकार प्रकरणी चार संशयितांना जामीन मंजूर…

⚡सावंतवाडी ता.२८-: आंबोली येथील संरक्षित वनक्षेत्रात जंगली सशाची शिकार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार संशयित आरोपींना आज न्यायालयाने प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.याकामी अँड. परिमल नाईक यांनी काम पाहिले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी २६ मार्च २०२५ रोजी रात्री हत्तींपासून संरक्षणासाठी गस्त घालत असताना माडखोल येथील दशरथ राऊळ आणि कुडाळ येथील प्रशांत कुबल यांना संशयास्पद…

Read Full News

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या हिरक महोत्सव कार्यालयाचे उदघाटन…

⚡मालवण ता.२८-:साठ वर्षापूर्वी लावलेले स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे रोपटे आज वटवृक्ष बनले असून हिरक महोत्सव साजरा करत आहे. या महाविद्यालयाने अनेक विद्यार्थी घडविले आहेत. महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी संस्था चालक, माजी विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांनी एकत्रित प्रयत्न करत ६१ व्या वर्षात पदार्पण करावे, असे प्रतिपादन उद्योजक तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी येथे बोलताना केले….

Read Full News

डॉ एपीजे अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर…

ओरोस ता २८सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. जिल्हास्तरावर चौथी मधून नेरूर शिरसोस जिल्हा परिषद शाळेच्या पियूष लाड याने सर्वाधिक २८४ गुण मिळवीत प्रथम क्रमांक मिळविला आहे. सातवी मधून कणकवली नंबर ३ जिल्हा परिषद शाळेच्या विराज कल्याणकर याने २५८ गुण मिळवीत प्रथम…

Read Full News

तिलारी घाट एसटी वाहतुकीस अयोग्य…

ब्लाइंड स्पॉट आरसे बसवण्याची केली मागणी :आठ दिवसात मागणीची पूर्तता करा सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांची मागणी ⚡दोडामार्ग ता.२८-: कर्नाटकात तसेच कोल्हापुरात जाण्यासाठी दोडामार्ग तालुक्यातून सगळ्यात लगतचा मार्ग असलेला तिलारी घाट गेले कित्येक महिने एसटी वाहतूकी साठी व अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला होता,आता तिलारी घाट सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत, मात्र परिवहन…

Read Full News

एसटी कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी परेश धर्णे…

वेंगुर्ला प्रतिनिधी- महाराष्ट्र एसटी कामगार संघटना वेंगुर्ला आगाराची वार्षिक सर्वसाधारण सभा २५ मार्च रोजी साई मंगल कार्यालय येथे विभागीय अध्यक्ष सुरेंद्र मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी सन २०२५-२०२६साठी निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी परेश धर्णे तर सचिवपदी दामोदर प्रभूखानोलकर यांची निवड करण्यात आली. फोटो – परेश धर्णे, पिटर डिसोजा, दामोदर प्रभूखानोलकर

Read Full News

ग्रामसेवक ज्ञानेश करंगुटकर यांचे उपचारादरम्यान निधन

वेंगुर्ला प्रतिनिधी- मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप ते पत्रादेवी बायपासवर मळगाव-कुंभार्ली येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेले उभादांडा-सुखटणकरवाडी येथील रहिवासी आणि तिरोडा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक ज्ञानेश अंकुश करंगुटकर (५४) यांचे २८ मार्च रोजी पहाटे गोवा-बांबुळी येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. फोटो – ज्ञानेश करंगुटकर

Read Full News

गुढीपाडवा आणि रमजान ईद दिवशी विद्युत पुरवठा अखंडित सुरु ठेवा…

सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनचे महावितरणला निवेदन.. कुडाळ : गुढीपाडवा आणि रमजान ईद दिवशी वीज पुरवठा अखंडित पणे सुरू ठेवावा, अशी मागणी सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन यांनी महावितरणकडे निवेदनाद्वारे केली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक ३० मार्च २०२५ रोजी हिंदू धर्मीयांचा महत्वाचा सण “गुढीपाडवा” येत असून, दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी मुस्लीम धर्मीयांची ईद, “इद-उल-फित्र” (रमजान ईद) साजरी होणारी आहे….

Read Full News

मरकज-उल-फलाह कडून जीवन आनंद संस्थेला मदत…

कुडाळ : मरकज-उल-फलाह या सेवाभावी संस्थेद्वारे, पवित्र रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर, अणाव येथील जीवन आनंद संस्था संचालित आनंद आश्रम या वृद्धाश्रमात विविध जीवनावश्यक वस्तू आणि फळफळावळचा पुरवठा करण्यात आला.मरकज-उल-फलाह या सेवाभावी संस्थेद्वारे, सामाजिक बांधिलकी जपत केल्या जाणारे विविध उपक्रम आदर्शवत आहेत. धार्मिक सलोखा आणि सर्वधर्मसमभाव वृद्धिंगत होण्यासाठी संस्था प्रयत्नशील असते.यावेळी जीवन आनंद संस्थेच्या वतीने संदीप परब…

Read Full News

जि प कर्मचाऱ्यांची गुढी पाडव्याची सुट्टी रद्द होईल का…?

मनसेचे कुणाल किनळेकर यांचा पालकमंत्र्यांना सवाल. कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना मार्च अखेरचे कारण देत गुढीपाडवा सणाची सुट्टी रद्द केली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्ववादी ब्रँड म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालकमंत्री नितेश राणे यांच्या जिल्ह्यात जिल्हा परिषद मार्फत हिंदू नववर्ष सणावर निर्बंध घातलेली बंदी उठवणार…

Read Full News

रोंबाट, राधानृत्य स्पर्धेसह शिमगोत्सव तयारी पूर्ण…

गुढीपाडवा शोभायात्रेत गोव्याचे चित्ररथ:काका कुडाळकर यांची पत्रकार परिषदेत माहिती.. कुडाळ : कोकणातील रोंबाट आणि राधा नृत्य या लोककलेला स्पर्धेच्या माध्यमातून ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतुन २९ आणि ३० मार्चला कुडाळ येथे भव्य रोंबाट, राधानृत्य आणि चित्ररथ स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती…

Read Full News

You cannot copy content of this page