कुडाळ : मरकज-उल-फलाह या सेवाभावी संस्थेद्वारे, पवित्र रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर, अणाव येथील जीवन आनंद संस्था संचालित आनंद आश्रम या वृद्धाश्रमात विविध जीवनावश्यक वस्तू आणि फळफळावळचा पुरवठा करण्यात आला.
मरकज-उल-फलाह या सेवाभावी संस्थेद्वारे, सामाजिक बांधिलकी जपत केल्या जाणारे विविध उपक्रम आदर्शवत आहेत. धार्मिक सलोखा आणि सर्वधर्मसमभाव वृद्धिंगत होण्यासाठी संस्था प्रयत्नशील असते.
यावेळी जीवन आनंद संस्थेच्या वतीने संदीप परब यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि रमजान सणाच्या शुभेच्छा दिल्या.
या वेळी एजाज नाईक यांनी यापुढे देखील जीवन आनंद संस्थेस सहकार्य करून जवाबदारी निभावण्याची हमी दिली.
मरकज-उल-फलाह या संस्थेचे संचालक हाफिज नाझिम यांनी वृद्धाश्रमाच्या कार्याची प्रशंसा केली. यावेळी कुडाळचे माजी नगरसेवक एजाज नाईक, हाफिज जहेज शेख, वसीम खान, मुबीन दोस्ती, अनिक नाईक आदी उपस्थित होते.
मरकज-उल-फलाह कडून जीवन आनंद संस्थेला मदत…
