सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनचे महावितरणला निवेदन..
कुडाळ : गुढीपाडवा आणि रमजान ईद दिवशी वीज पुरवठा अखंडित पणे सुरू ठेवावा, अशी मागणी सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन यांनी महावितरणकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक ३० मार्च २०२५ रोजी हिंदू धर्मीयांचा महत्वाचा सण “गुढीपाडवा” येत असून, दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी मुस्लीम धर्मीयांची ईद, “इद-उल-फित्र” (रमजान ईद) साजरी होणारी आहे. दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी सोमवार येत आहे आणि सोमवारी महावितरण कार्यालयाकडून सकाळी 09.00 ते सायंकाळी 05.00 या वेळेत विद्युत पुरवठा खंडित केला जातो.
तरी “गुढीपाडवा” आणि “इद-उल-फित्र” (रमजान ईद) च्या पार्श्वभूमीवर रविवार दिनांक ३० मार्च २०२५ आणि सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात विद्युत पुरवठा अखंडित सुरु राहील याची आपण दक्षता घ्यावी अशी सूचना निवेदनाद्वारे अधीक्षक अभियंता, सिंधुदुर्ग यांना सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन च्या वतीने आज करण्यात आली.
यावेळी कुडाळचे माजी नगरसेवक एजाज नाईक,
हाफिज जहेज शेख, रिझवान मणीयार, मुबीन दोस्ती, अनिक नाईक, शाहिद दोस्ती, आदी उपस्थित होते.
