डॉ एपीजे अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर…

ओरोस ता २८
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. जिल्हास्तरावर चौथी मधून नेरूर शिरसोस जिल्हा परिषद शाळेच्या पियूष लाड याने सर्वाधिक २८४ गुण मिळवीत प्रथम क्रमांक मिळविला आहे. सातवी मधून कणकवली नंबर ३ जिल्हा परिषद शाळेच्या विराज कल्याणकर याने २५८ गुण मिळवीत प्रथम क्रमांक मिळविला आहे.
या परीक्षेमध्ये चौथी मध्ये आरोंदा मानसी जिल्हा परिषद शाळेच्या वृंदा आवडण हिने २८० गुण मिळवीतद्वितीय तर फोंडा नंबर १ शाळेच्या देवेन पाटील याने २७६ गुण मिळवीत तृतीय क्रमांक मिळविला आहे. सातवी मधून विद्या मंदिर हेत शाळेच्या वैदेही फोंडके हिने २४२ गुण मिळवीत द्वितीय आणि घोडगेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या ओम भणगे याने २४० गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ गणपती कमळकर यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page