Headlines

आभाळमाया ग्रुप व जी एच फिटनेस कट्टा यांच्या रक्तदान शिबिरात 235 रक्तदात्यांनी केले रक्तदान…

⚡मालवण ता.२०-: सहकार महर्षी प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथी निमित्त आभाळमाया ग्रुप व जी. एच. फिटनेस कट्टा यांच्या वतीने वराडकर हायस्कूल कट्टा येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात २३५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. आभाळमाया ग्रुप व जी. एच. फिटनेस कट्टा यांच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटनकट्टा…

Read More

देवगडात जल्लोष कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन…

⚡देवगड ता.२०-:देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्था देवगडच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे नववर्षाच्या स्वागतासाठी देवगड बीच येथे जल्लोष २०२५ चे आयोजन केले जाते. या निमित्ताने आयोजित जल्लोष समिती २०२५ या कार्यालयाचे उदघाटन कुलकर्णी सुपर शॉपीचे मालक सुनील कुलकर्णी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फित कापून करण्यात आला.यावेळी जल्लोष समितीचे अध्यक्षहनीफ मेमन, उपाध्यक्ष श्रीपाद पारकर, सहसचिव संदेश शिरसाठ,खजिनदार मधुकर…

Read More

सावंतवाडी तालुका मंडारी मंडळाची वार्षिक सभा संपन्न…

सावंतवाडी ता.२०- सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाची वार्षिक सभा भंडारी भवनाच्या टेरेसवरील सभागृहात प्रभारी अध्यक्ष श्री.प्रसाद अरविंदेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या सभेस उपाध्यक्ष श्री.देविदास आडारकर, श्री.गुरुनाथ पेडणेकर, खजिनदार श्री.वाडकर,.सचिव श्री.दिलीप पेडणेकर, स.सचिव श्री.नामदेव साटेलकर, सदस्य श्री. हनुमंत पेडणेकर, श्री ज्ञानदिप राऊळ, श्री.दिपक जोशी, श्री.निलेश कुडव, श्री. संजय पिळणकर, श्री.सिद्धार्थ पराडकर. श्री.रत्नाकर नाईक, श्री.लवू कुडव , श्री.ज्ञानदिप…

Read More

राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी २२ रोजी जिल्हा संघ निवड चाचणी स्पर्धा…

⚡मालवण ता.२०-: मुंबई बिर्ला पब्लीक स्कूल, कल्याण येथे दि. २९ ते३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय पुरूष सिनीयर बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची संघ निवड चाचणी स्पर्धा रविवार दि. २२ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत मालवण तालुक्यातील कट्टा येथील वराडकर हायस्कूल येथे होणार आहे. तरी या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूने…

Read More

महिलांच्या प्रश्नांबाबत उज्वला येळावीकर यांनी वेधले रुपाली चाकणकर यांचे लक्ष…

ओरोस येथे भेट घेऊन दिले प्रश्नांबाबतचे निवेदन:प्रश्न सोडविण्याची केली मागणी.. कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांच्या प्रमुख समस्या बाबत राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्ष उज्ज्वला येळावीकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे लक्ष वेधले आहे. त्या आशयाचे निवेदन त्यांनी श्रीमती चाकणकर याना गुरुवारी ओरोस येथे भेटून दिले.श्रीमती चाकणकर यांना दिलेल्या निवेदनात सौ. येळावीकर यांनी म्हटले…

Read More

धोकादायक विद्युत खांबाकडे मंदार शिरसाट यांनी वेधले लक्ष…

सा.बा. विभागाला निवेदन तर महावितरणशी चर्चा:हॉटेल आरएसएन ते एसआरएम कॉलेज मार्गावर धोकादायक पोल.. कुडाळ : कुडाळ शहरात हॉटेल आरएसएन ते संत राऊळ महाराज चौक रस्त्यावरिल काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर विद्युत खांब तसेच ठेवण्यात आले आहेत याकडे कुडाळ नगर पंचायतचे आरोग्य सभापती मंदार शिरसाट यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि महावितरण विभागाचे लक्ष वेधले आहे. हे विद्युत…

Read More

चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाळूने भरलेला डंपर पलटी…

सकाळी दहाची घटना:सुदैवाने चालक बचावला.. ⚡मालवण ता.२०-: मालवण कोळंब येथील पुलानजीक वाळूने भरलेला डंपर वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने डंपर मुख्य रस्त्यावरून खाडी पात्राच्या दिशेने असलेल्या उताराच्या रस्त्यावरून उलट्या दिशेने खाली जाऊन पलटी झाल्याची घटना आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात सुदैवाने चालक सुजितकुमार हा बचावला आहे. या अपघातानंतर पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी…

Read More

मिशन सिंधू रक्तक्रांती २०२५ – २०३०रक्तदानाचा हेतू, बांधूया जिवनसेतू…

युवा रक्तदाता ग्रुप” आणि “कुलसुम ॲग्रोटेक, नारिंग्रे” यांच्या पुढाकाराने “मिशन सिंधू रक्तक्रांती २०२५ – २०३०” या उपक्रमाचा केला संकल्प.. ⚡देवगड ता.१९-: थेंबथेंब रक्ताचा ध्यास, सिंधू रक्तक्रांतीचा प्रवास” या उद्दिष्टाने प्रेरित होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहिबांव, बागमळा आणि नारिंग्रे या गावांतील “युवा रक्तदाता ग्रुप” आणि “कुलसुम ॲग्रोटेक, नारिंग्रे” यांच्या पुढाकाराने “मिशन सिंधू रक्तक्रांती २०२५ – २०३०” या…

Read More

श्वेता कोरगावकर यांनी मंत्री राणें व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेत दिल्या शुभेच्छा…!

⚡बांदा ता.१९-: भाजपच्या सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर यांनी कॅबिनेट मंत्री नितेश राणे व भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची नागपूर येथे भेट घेत शुभेच्छा दिल्यात. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाबाबत तसेच महिलांसाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत चर्चा करण्यात आली.महायुतीच्या यशात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला देखील महायुतीच्या तीनही…

Read More

अखेर निगुडे नळ योजना सुरळीत…

गुरुदास गवंडे यांनी वेधले गटविकास अधिकार्‍यांचे लक्ष.. ⚡बांदा ता.१९-: निगुडे माजी उपसरपंच गुरदास गवंडे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला इशारा दिल्यानंतर नळ योजनेची पाईपलाईन तत्काळ दुरुस्त करण्यात आली. यासंदर्भात गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांचे लक्ष वेधण्यात आले होते.गेले अनेक दिवस निगुडे गावातील नळ योजनेची पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटून पाण्याची नासाडी होत होती. माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी…

Read More
You cannot copy content of this page