Headlines

अखेर निगुडे नळ योजना सुरळीत…

गुरुदास गवंडे यांनी वेधले गटविकास अधिकार्‍यांचे लक्ष.. ⚡बांदा ता.१९-: निगुडे माजी उपसरपंच गुरदास गवंडे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला इशारा दिल्यानंतर नळ योजनेची पाईपलाईन तत्काळ दुरुस्त करण्यात आली. यासंदर्भात गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांचे लक्ष वेधण्यात आले होते.गेले अनेक दिवस निगुडे गावातील नळ योजनेची पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटून पाण्याची नासाडी होत होती. माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी…

Read More

जिल्हा भाजपा कडून नामदार नितेश राणे यांचे २२रोजी भव्य दिव्य स्वागत व नागरी सत्कार…

प्रभाकर सावंत,मनिष दळवी: २२डिसेंबरला स्वागताची जिल्हा भाजपाकडून जय्यत तयारी… ⚡ओरोस ता.१९-: कणकवली विधानसभेचे आमदार नितेशजी राणे यांनी मा मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आणि रविवार दिनांक २२ डिसेंबर रोजी ते जिल्ह्यात मंत्री म्हणून प्रथमच दाखल होत आहेत या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतीय जनता पार्टी परिवार, महायुतीचे सगळे पदाधिकारी,कार्यकर्ते व…

Read More

व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडियम प्रशालेत शाळास्तरावर आयोजित वेशभूषा स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद…!

⚡बांदा ता.१९-: येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडियम प्रशालेत शाळास्तरावर आयोजित करण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. मुलांनी विविध प्रकारच्या वेशभूषा साकारून उपस्थितांची वाहवा मिळविली.  नर्सरी ते ज्युनिअर केजी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना फळे हा विषय देण्यात आला होता. तर सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांना भाज्या हा विषय दिला गेला होता. इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक…

Read More

वेंगुर्ल्यात महाआरोग्य शिबिराचे आयोजन…!

वेंगुर्ला प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य संक्रमण परिषद यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार दरवर्षी राज्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. या परिषदेच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन आधार फाऊंडेशन, सिधुदुर्ग या संस्थेतर्फे ३० डिसेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत वेंगुर्ला येथील उपजिल्हा रूग्णालयात महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात शासकीय – निमशासकीय कार्यालय, ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालय,…

Read More

माकडांच्या उपद्राव रोखण्यासाठी जलद कृती दलामार्फत बंदोबस्त करा…

साईप्रसाद काणेकर:उपवनसंरक्षक नंदकुमार रेड्डी यांच्याकडे निवेदनद्वारे केली मागणी.. ⚡बांदा ता.१९-: माकडांपासून शेती बागायतीचे भरपूर नुकसान करण्यात येते. नागरिक व शेतकरी यांना माकडांच्या उपद्रवापासून रोखण्यासाठी जलद कृती दलामार्फत त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना ठाकरे गटाचे बांदा शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हा उपवनसंरक्षक नंदकुमार रेड्डी यांच्याकडे केली आहे. निवेदनात म्हटले…

Read More

चित्रकला स्पर्धेत काशिनाथ आणि चाहत प्रथम…!

⚡वेंगुर्ला ता.१९-: नगर वाचनालय वेंगुर्ला संस्थेतर्फे अनिल श्रीकृष्ण सौदागर पुरस्कृत कै.पद्माकर सखाराम सौदागर स्मृती चित्रकला स्पर्धा ८ डिसेंबर रोजी घेण्यात आल्या. यात लहान गटात काशिनाथ तेंडोलकर तर मोठ्या गटात चाहत शुक्ला यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

Read More

कालव्यात कार कोसळून महिलेचा मृत्यू…!

⚡दोडामार्ग ता.१९-: साटेली भेडशी भोमवाडी येथील कालव्यात स्कॉर्पिओ गाडीला अपघात होत गाडी थेट कालव्यात जात गाडीतील एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी मध्यरात्री घडली.या अपघातानंतर स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही स्कॉर्पिओ गाडी ही साटेली- भेडशी भोमवाडी लगतच्या गावातील असून या गाडीत दोघेजण होते. अपघातानंतर स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही गाडी कुडासेच्या दिशेने जात असताना चालकाचे गाडीवरील…

Read More

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे कणकवलीत स्वागत…!

⚡कणकवली ता.१९-: राष्ट्रवादी पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा व महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर यानी आज सिंधुदुर्ग दौरा प्रारंभ करण्यापुर्वी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या कणकवली येथील निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी अबिद नाईक यांच्या पत्नी सौ. हुमेरा नाईक यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यावेळी अबिद नाईक यांच्या आई सौ हवाबी नाईक, वडील…

Read More

कुडाळमध्ये २२ ला शासकीय सेवा आणि योजनांचा महामेळावा…

न्या. जी. ए. कुलकर्णी आणि न्या. पी. आर. ढोरे यांची माहिती:जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वकील संघ वगैरेंचे सहकार्य.. ⚡कुडाळ ता.१८-: आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचा आणि सामान्य लोकांचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे अशा लोकांना शासकीय योजनांची आणि सेवांची माहिती मिळावी यासाठी कुडाळ मध्ये रविवारी २२ डिसेंबरला शासकीय सेवा आणि योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला…

Read More

ज्येष्ठ नागरिक सेवक संघाची २३ रोजी सभा…

⚡मालवण ता.१८-: ज्येष्ठ नागरिक सेवा संघ मालवणची मासिक सभा दि. २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता हॉटेल लिलांजली, भरड मालवण येथे अध्यक्ष सुभाष दिघे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी साने गुरुजी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त डॉ. सुभाष दिघे हे प. पू. साने गुरुजी यांची माहिती देणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन बाळकृष्ण माणगावकर यांनी केले.

Read More
You cannot copy content of this page