व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडियम प्रशालेत शाळास्तरावर आयोजित वेशभूषा स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद…!

⚡बांदा ता.१९-: येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडियम प्रशालेत शाळास्तरावर आयोजित करण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. मुलांनी विविध प्रकारच्या वेशभूषा साकारून उपस्थितांची वाहवा मिळविली.
  नर्सरी ते ज्युनिअर केजी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना फळे हा विषय देण्यात आला होता. तर सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांना भाज्या हा विषय दिला गेला होता. इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते, तिसरी चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय नेते व सहावी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पौराणिक हे विषय देण्यात आले होते.
यामध्ये नर्सरी मधून शिवांशू दळवी पहिला, खेमराज कोठावळे दुसरा व अरिबा शेख हिला तिसरा क्रमांक प्राप्त झाला. ज्युनिअर केजी मधून मोक्ष पटेल याला पहिला, अरीयाना बुडकुले दुसरा व उरूज शहाबाद शेख यांना तिसरा क्रमांक प्राप्त झाला.
सिनियर केजी मधून ध्रुव चव्हाण पहिला, प्रज्ञेश राऊळ दुसरा व मोहसीन खान यांना तिसरा क्रमांक प्राप्त केला. इयत्ता पहिली मधून रिवांश सारंग, उस्मान शेख आणि मंथन देसाई यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले.
इयत्ता दुसरी मधून शांभवी पालव, चैतन्य नाईक, विहान कोठावळे यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले. इयत्ता तिसरी चौथी आणि पाचवीच्या गटामधून सिद्धी प्रभूशिरोडकर पहिली, निशांत बहिरे व हर्ष विजय नाईक दुसरा, फवाद बुरान व स्वरा विरनोडकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
इयत्ता सहावी आणि सातवीच्या गटात अन्वयी पवार पहिली, ऋतुराज नाईक द्वितीय दुसरा व खुशी गवस हिला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
या स्पर्धेसाठी सहभागी पालक व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेचे सूत्रसंचालन शिक्षिका सेजल शेटये आणि सौ. स्नेहा नाईक यांनी केले. रेश्मा म्हावळणकर व प्रशालेच्या शिक्षिका सौ. शिल्पा कोरगावकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
फोटो :-
बांदा येथे नाबर प्रशालेत आयोजित वेशभूषा स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक. (छायाचित्र – निलेश मोरजकर)

You cannot copy content of this page