ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद…
⚡कणकवली ता.१५-: पावसाळ्याच्या दिवसांत नैसर्गिकरित्या पेडांवर उगवणाऱ्या अळंबीला मोठी मागणी असते. कणकवली येथील बाजारात सध्या पेडावर उगवलेली ताजी अळंबी विक्रीसाठी उपलब्ध झाली असून ग्राहकांकडून तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जंगल परिसरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी नैसर्गिकरित्या उगवलेली ही अळंबी गोळा करून बाजारात विक्रीस आणली आहे. चविष्ट आणि पौष्टिक मानल्या जाणाऱ्या या अळंबीला पावसाळ्यात विशेष मागणी असते. सकाळपासूनच अनेक ग्राहकांनी अळंबी खरेदीसाठी गर्दी केली. पावसाळ्यात मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध होणाऱ्या या अळंबीमुळे विक्रेत्यांनाही चांगला आर्थिक हातभार लागत असून, स्थानिक बाजारात ग्रामीण भागातून येणाऱ्या नैसर्गिक उत्पादनांना चांगली पसंती मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
