Headlines

वैभववाडीत 20 जुलैला भव्य रोजगार मेळावा…

⚡वैभववाडी ता.१५-: महाराणा प्रताप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षण मंत्री भाजपा राष्ट्रीय सचिव तथा खासदार विनोद तावडे यांच्या वाढदिवसानिमित्त आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात सोमवारी 20 जुलै 2026 रोजी स्थानिक समिती सचिव तथा जि प सदस्य प्रमोद रावराणे यांच्या संकल्पनेतून भव्य रोजगार मेळावा आयोजित केला आहे विविध बँकां कंपन्यांमध्ये थेट नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ के आर चव्हाण यांनी दिली.
आनंदीबाई रावराणे महाविद्यालय तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन 20 जुलै रोजी केले आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाविद्यालयात पत्रकार परिषद झाली यावेळी स्थानिक संस्थेचे सचिव तथा जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे संस्थेचे संचालक शरद रावराणे प्राध्यापक एस एन पाटील प्राध्यापक डॉ अजित दिघे प्राध्यापक डॉ चौगुले अधीक्षक संजय रावराणे आदी उपस्थित होते.
प्राचार्य चव्हाण म्हणाले आनंदीबाई रावराणे महाविद्यालय आणि परिसरातील इतर महाविद्यालयातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या हेतूने महाविद्यालयाने यावर्षी महत्वकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे 20 जुलै 2026 रोजी रोजगार मिळवायचे आयोजन केले आहे सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत हा मेळावा होईल या मेळाव्याला विविध बँका आणि नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे आतापर्यंत 153 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे ज्यांना या मेळाव्यात सहभागी व्हायचे आहे त्यांना नोंदणी करणे आवश्यक आहे तालुक्यासह जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी ही मोठी संधी आहे याशिवाय करिअर मार्गदर्शन रोजगार व सह रोजगार विषयी माहिती तसेच कौशल्य विकास व प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन दिले जाणार आहे 2023 ते 2026 या कालावधीत पदवी पूर्ण केलेले उमेदवार या रोजगार मिळवण्यासाठी पात्र असणार आहेत.
डॉ अजित दिघे म्हणाले ज्या बँका व कंपन्या रोजगा मेळव्यारासाठी उपस्थित राहतील त्या बँका व कंपनीच्या वतीने उमेदवारांची परीक्षा घेण्यात येईल त्यानंतर निवड केली जाईल असे सांगितले. या रोजगार मेळाव्यातून ज्या विद्यार्थ्यांची निवड होईल त्यांना महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर व जिल्ह्यालेत नोकरीची संधी मिळणार आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्या रोजगार मेळाव्याला नोंदणी करावी असे आव्हान महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page