सीताराम गावडे यांच्या हस्ते बांदा-डिंगणे-कळणे रस्त्याचे भूमिपूजन…!
⚡बांदा ता.२१-: जिल्हा नियोजन मधून मंजूर झालेल्या बांदा-डिंगणे-कळणे या रस्त्याचे भूमिपूजन करताना बांदा रोटरी क्लबचे अध्यक्ष सीताराम गावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाले. बांदा डिंगणे कळणे रस्ता हा खड्डेमय झाल्याने वाहतुकीस धोकादायक बनला होता. त्यामुळे या रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी होत होती. जिल्हा नियोजन मधून रस्ता काम मंजूर झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
