⚡बांदा ता.२१-: जिल्हा नियोजन मधून मंजूर झालेल्या बांदा-डिंगणे-कळणे या रस्त्याचे भूमिपूजन करताना बांदा रोटरी क्लबचे अध्यक्ष सीताराम गावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाले.
यावेळी बांदा सरपंच प्रियांका नाईक, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, रूपाली शिरसाट, श्रेया केसरकर, तनुजा वराडकर, देवल यडवे, भाजपा बांदा मंडल तालुका उपाध्यक्ष सिद्धेश पावसकर, बांदा भाजपा शहर अध्यक्ष बाबा काणेकर, मंदार महाजन, कंत्राटदार अमोल भाईप यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
बांदा डिंगणे कळणे रस्ता हा खड्डेमय झाल्याने वाहतुकीस धोकादायक बनला होता. त्यामुळे या रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी होत होती. जिल्हा नियोजन मधून रस्ता काम मंजूर झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
