जिल्ह्यातील महायुतीचे तिन्ही आमदारांचा 25 रोजी सावंतवाडीत भव्य सत्कार…

⚡सावंतवाडी ता.२१-: सावंतवाडीमध्ये माजी मंत्री दीपक केसरकर, कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आम. निलेश राणे यांचा महायुतीच्यावतीने बुधवारी 25 डिसेंबरला सावंतवाडीत भव्य सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन महायुतीच्यावतीने करण्यात आले आहे.

राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी आमदार नितेश राणे यांची निवड झाली असून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून विजयी चौकार मारत दीपक केसरकर यांनी विक्रम केला आहे. तसेच निलेश राणे यांनी कुडाळ-मालवण मतदारसंघातून विधानसभेत एन्ट्री केली आहे‌. या चे औचित्य साधून महायुतीच्या या नेत्यांचा भव्य सत्कार सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. बुधवारी 25 डिसेंबरला मोती तलाव काठी शिवउद्यानजवळ याच आयोजन करण्यात आल आहे. या सत्कार सोहळ्यास महायुतीच्या सर्व पदाधिकारी ,कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page