Headlines

जिल्हा भंडारी भवन एका वर्षात उभे करू…

पालकमंत्री नितेश राणे:कुडाळ तालुका भंडारी मेळाव्यात नितेश राणेंची ग्वाही ;कुडाळ तालुका भंडारी मेळावा आणि गुणगौरव सोहळा उत्साहात.. कुडाळ : जिल्ह्यात भंडारी भवन उभारण्यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. तुम्ही मला योग्य ती जागा दाखवा. तुम्ही घरी जायच्या आत त्या जागेचा प्रस्ताव मंजूर झालेला असेल आणि एका वर्षात भंडारी भवन त्या जागेवर निश्चितपणे उभे राहील असा विश्वास…

Read Full News

कट्टा येथील रानभाजी पाककला स्पर्धेत श्लोक चांदरकर हा प्रथम तर गार्गी कांबळी ही द्वितीय..

⚡मालवण ता.२०-:कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे स्काऊट गाईड व हरितसेना विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी पाककला स्पर्धा, प्रदर्शन व विक्री याला विद्यार्थी व पालकांचा उदंड प्रतिसाद लाभला यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी पाककला स्पर्धेत श्लोक समीर चांदरकर याने प्रथम क्रमांक तर गार्गी सुरेश कांबळी हिने द्वितीय क्रमांक पटकावीला कोकणात पावसाळ्यात सगळीकडे सहजासहजी…

Read Full News

लायन्स मदतीसाठी नेहमी तत्पर…

डॉ. किरण खोराटे:कुडाळ लायन्स क्लबचे पदग्रहण उत्साहात.. ⚡कुडाळ ता.२०-: समाजात सामाजिक बांधिलकी जोपासून लायन्स ही सेवाभावी संस्था मानवतेची,समाजाची सेवा करत आहे. अनेक संकटात ही आंतरराष्ट्रीय संस्था मदतीसाठी नेहमीच अग्रेसर आहे असे प्रतिपादन एमजेएफ लायन डॉ किरण खोराटे यांनी लायन्स क्लब ऑफ  कुडाळ सिंधुदुर्गच्या पदग्रहण सोहळ्यात केले. हा सोहळा संगीतमय वातावरणात दिमाखात पार पडला. नूतन पदाधिकारी…

Read Full News

एकनाथ नाडकर्णी घेतली पालकमंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट…

⚡दोडामार्ग ता.२०-: एकनाथ नाडकर्णी यांनी आज पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेत आगामी स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी चर्चा केली. कुठल्याही परिस्थितीत जिल्हा परिषद वर भाजपच्या झेंडा फडकवण्याचा शब्द यावेळी मंत्री राणे यांना दिला. श्री नाडकर्णी यांची पक्षविरोधी काम केल्याने विधानसभा निवडणुकीत पक्षातून निलंबन करण्यात आले होते. मात्र त्यांचे निलंबन आता मागे घेण्यात आले असून आगामी…

Read Full News

दारिस्तेतील विद्यार्थ्यांना युवासेनेकडून छत्र्यांचे वाटप…!

⚡कणकवली ता.२०-: शिवसेना उबाठा पक्षाच्या युवासेनेचे कणकवली युवासेना तालुकाप्रमुख उत्तम सुरेश लोके यांनी दारिस्ते येथील जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत छत्र्यांचे वाटप केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुधाकर जाधव, युवासेना शाखाप्रमुख विजय गावकर, युवासेना उपशाखाप्रमुख श्रीराम गुरव, लवू पवार, सुरेश लोके, अंगुली जाधव, संदीप गांवकर, मदन बागवे, दिलीप लोके, ओमकार गावकर यांच्यासह शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित…

Read Full News

केंद्र पुरस्कृत लाभार्थ्यांनी सत्यापन अॅपद्वारे हयात प्रमाणपत्राचे रजिस्ट्रेशन करावे…

कणकवली तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांचे आवाहन:हयात प्रमाणपत्र लाभार्थ्याला देण्याचे प्रात्यक्षिक.. ⚡कणकवली ता.२०-: केंद्र शासन पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एक नवीन सुविधा विकसित करण्यात आली आहे. त्यामध्ये सत्यापन अॅपद्वारे लाभार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन…

Read Full News

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या…

पश्चिम रेल्वेकडून ५ तर मध्य रेल्वेकडून ११ गणपती विशेष गाड्यांची घोषणा:भाविकांच्या सोयीसाठी मध्य तसेच पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून गुजरातसह मुंबई, पुणे येथून फेऱ्या जाहीर.. ⚡कणकवली ता..२०-: कोकणात गणेशोत्सासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्य तसेच पश्चिम रेल्वेच्या मार्गांवरून गुजरातसह मुंबई, पुणे येथून कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्यांच्या फेऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत. १७ जुलै रोजी जाहीर…

Read Full News

कुडाळ मध्ये बैलाच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू…

कुडाळ : येथील मधली कुंभारवाडी येथील श्रीमती पुष्पलता रामचंद्र मांजरेकर (वय ७०) हिला शनिवारी पहाटे त्यांच्याच बैलाने हल्ला केल्याने त्यात तिचा मृत्यू झाला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक उदय मांजरेकर व टेम्पो व्यावसायिक पंढरी उर्फ बंडया मांजरेकर यांची ती आई होय.श्री मांजरेकर कुंटूबियांनी एक महिन्यापूर्वी बैल घेतला होता. मात्र तो…

Read Full News

साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती प्रबोधन-मार्मिक कथा स्पर्धेचे आयोजन…

⚡वेंगुर्ले ता.१९-: प्रबोधन गोरेगाव संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक धडाडीचे शिवसैनिक स्व. वसंत तावडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सलग दुसऱ्या वर्षी ‘साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती प्रबोधन-मार्मिक कथा २०२५’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेया स्पर्धेसाठी मराठी कथेसाठी किमान ३००० ते कमाल ४००० एवढी शब्दमर्यादा आहे. प्रथम पारितोषिक रु. १५,०००/, द्वितीय रु. १०,०००, तृतीय रु. ७,५००, प्रथम उत्तेजनार्थ रु.५०००,…

Read Full News

कोकणातील ५ जिल्ह्यातील ५९३ गावांवर विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केल्या…

विनायक राऊत:कोकणीभुमी गिळंकृत करायला एकनाथ शिंदेंचं नगरविकास खात निघालं.. ⚡सावंतवाडी ता.१९-: महाराष्ट्र सरकारमधील कोकण बळकावू नेत्यांची वक्रदृष्टी कोकणावर पडली आहे. सिडकोचा प्रस्ताव रद्द झाल्यानं नगरविकास खात्याने पुन्हा जीआर काढला असून एमएसआरडीसीतून कोकणातील ५ जिल्ह्यातील ५९३ गावांवर विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केल्याची माहिती उबाठा शिवसेना नेते, माजी खासदार विनायक राऊत यांनी दिली. तसेच कोकणीभुमी गिळंकृत…

Read Full News

You cannot copy content of this page