Headlines

भाजप सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीसपदी महेश सारंग यांची पुन्हा फेरनिवड..!

⚡सावंतवाडी ता.१८-: भारतीय जनता पार्टीच्या सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस पदी महेश सारंग यांची पुन्हा फेरनिवड करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी कार्यकारणीच्या बैठकीत केली. श्री सारंग यांचं संघटना वाढीसाठी योगदान मोठे आहे ते पक्षासाठी अहोरात्र वेळ देऊन मेहनत घेत असतात त्यांच्या या कामाबद्दल पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष यांनी त्यांची ही निवड केली आहे.

Read Full News

सिंधुदुर्गला पावसाने झोपडले…

कणकवली तालुक्यात सर्वाधिक पाऊस:गडनदी भरली तुंडुंब ; अनेक रस्ते पाण्याखाली.. कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील काही दिवस संततधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याला २१ ऑगस्ट पर्यंत रेड अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. मात्र रविवारी रात्रीपासून ते सोमवार दुपार पर्यंत मुसळधार पाऊस कोसळला आणि अनेक ठिकाणची वाहतूक ठप्प झाली. अनेक ठिकाणी नद्या नाले तुडुंब…

Read Full News

मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचा प्रश्न लवकरच सुटेल…

आमदार दीपक केसरकर: उपजिल्हा रुग्णालयात आणखीन चांगल्या सुविधा देण्यासाठी आपले प्रयत्न राहणार.. ⚡सावंतवाडी ता.१८-: मल्टिस्पेशालिटी प्रश्न हा राजघराण्याच्या सह्यांसाठी रखडला आहे. सह्या झाल्या की या ठिकाणी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल होणार आहे. अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. तर आवश्यक लॅब, रक्तपेढी उप जिल्हा रुग्णालयात असल्याने त्याच ठिकाणी मल्टिस्पेशालिटी व्हावं. ते शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी,…

Read Full News

मी संमती दिली म्हणून गेळे गावातील जमीनीचे वाटप होऊ शकले…

आमदार दीपक केसरकर: श्रेय लाटण्यासाठी काहीजण ग्रामस्थांची दिशाभूल करतायत,मी मतांसाठी कधी राजकारण केले नाही, संदीप गावडेंना नाव न घेता टोला.. ⚡सावंतवाडी ता.१८-: मी संमती दिली म्हणून गेळे गावातील कबुलायतदार जमीनीचे वाटप होऊ शकले. कारण, त्या समितीचा अध्यक्ष मी आहे. केवळ श्रेय लाटण्यासाठी काहीजण ग्रामस्थांची दिशाभूल करत आहेत. मी मतांसाठी कधी राजकारण केले नाही असा टोला…

Read Full News

जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेमध्ये मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश…!

⚡सावंतवाडी ता.१८-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य तर्फे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेमध्ये मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश संपादन केले आहे.सदर स्पर्धा कॉड व इनलाईन या प्रकारांमध्ये घेण्यात आली होती.16 ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे ही स्पर्धा संपन्न झाली.यामध्ये 17 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये कु. अभिनव…

Read Full News

जयवंत दळवींच्या साहित्याचे पारडे अधिक जड…

विश्वास पाटील:जयवंत दळवींच्या जन्मशताब्दीनिमित्त मालवणात चर्चासत्र.. ⚡मालवण ता.१७-:जयवंत दळवी यांचे साहित्य हे वास्तववादी जसे होते तसे त्यांच्या साहित्यात आशय आणि विषय हा ठासून भरलेला आहे. चक्र आणि अंधारातल्या पारंब्या या दोन कादंबऱ्या तर नवलेखकांसाठी वस्तूपाठ आहेत, असे असले तरी मराठीतील प्राध्यापिकी समीक्षकांनी जयवंत दळवीना त्यांच्या साहित्याच्या कुवतीला जोखणारी फारशी पारितोषिके मिळू दिली नाहीत. परंतु दळवी…

Read Full News

मळगाव – नेमळे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य…

अपघातांची भीती: तात्काळ दुरुस्ती करा, ग्रामस्थांची मागणी.. ⚡सावंतवाडी ता.१७-: नेमळे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून वाहनधारकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यामुळे रस्त्याची दुरवस्था अधिकच वाढली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. या रस्त्यावरून दररोज शाळकरी मुले, कामगार व शेतकरी वर्ग प्रवास करतात. सकाळ-संध्याकाळ वाहनांची वर्दळ वाढत…

Read Full News

गणेशोत्सवासाठी कुडाळ न.पं. सज्ज

कुडाळ : गणेश उत्सवासाठी कुडाळ नगरपंचायत सज्ज झाली असून नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली गणेश उत्सवाच्या नियोजनाची बैठक नुकतीच संपन्न झाली. यामध्ये पार्किंग व्यवस्था आणि फिरत्या भाजी विक्रेत्यांना कोणत्या जागा द्याव्यात यावर चर्चा करण्यात आली.गणेश उत्सवाच्या नियोजना संदर्भात कुडाळ नगरपंचायत येथे नुकतीच सभा संपन्न झाली. यावेळी मुख्याधिकारी अरविंद नातू, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक राजीव कुडाळकर,…

Read Full News

सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम उत्साहात संपन्न…!

⚡सावंतवाडी ता.१७-: तालुका भंडारी मंडळ, सावंतवाडी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन रविवार दि १० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता भंडारी भवन,सावंतवाडी येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन मंडळाचे अध्यक्ष दत्तप्रसाद अरविंदेकर,भंडारी पतपेढीचे चेअरमन गुरूदास पेडणेकर,महिला अध्यक्षा सौ.शीतल नाईक, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे सावंतवाडी तालुका सल्लागार सुधीर पराडकर,सचिव दिलीप पेडणेकर, उपाध्यक्ष देविदास आडारकर,हनुमंत…

Read Full News

संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीमध्ये आयोजित तीन दिवसीय भव्य ‘नाट्यमहोत्सवा’चा शानदार शुभारंभ…!

⚡सावंतवाडी ता.१७-: शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीमध्ये आयोजित तीन दिवसीय भव्य ‘नाट्यमहोत्सवा’चा शुभारंभ माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. शुभारंभाला ‘भगदत्त वध’ हे नाटक सादर करण्यात आले. याला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. येथील गोविंद चित्रमंदिरात या नाट्यमहोत्सवास प्रारंभ झाला. माजी उपनगराध्यक्ष श्री. पोकळे यांच्या उपस्थितीत या उत्सवास…

Read Full News

You cannot copy content of this page