गणेशोत्सवासाठी कुडाळ न.पं. सज्ज

कुडाळ : गणेश उत्सवासाठी कुडाळ नगरपंचायत सज्ज झाली असून नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली गणेश उत्सवाच्या नियोजनाची बैठक नुकतीच संपन्न झाली. यामध्ये पार्किंग व्यवस्था आणि फिरत्या भाजी विक्रेत्यांना कोणत्या जागा द्याव्यात यावर चर्चा करण्यात आली.
गणेश उत्सवाच्या नियोजना संदर्भात कुडाळ नगरपंचायत येथे नुकतीच सभा संपन्न झाली. यावेळी मुख्याधिकारी अरविंद नातू, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, उदय मांजरेकर, गणेश भोगटे, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, एमआयडीसी अभियंता रेवणकर तसेच बांधकाम विभाग एसटी महामंडळ आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी एसटी महामंडळाला सक्त सूचना देण्यात आल्या, की एसटी बस एक मार्ग करावा जेणेकरून वाहतूक कोंडी होऊ नये. तसेच मुख्य रस्त्यावर भाजी विक्रेत्यांनी भाजी विक्री करू नये. चतुर्थीच्या कालावधीमध्ये फक्त गणेश उत्सवासाठी लागणारे माटी साहित्य विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छता विद्युत पुरवठा याकडे कटाक्षाने लक्ष देण्यासंदर्भात नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. हा सण उत्साहाचा आणि आनंदाने साजरा करावा असे आवाहन यावेळी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page