Headlines

सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम उत्साहात संपन्न…!

⚡सावंतवाडी ता.१७-: तालुका भंडारी मंडळ, सावंतवाडी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन रविवार दि १० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता भंडारी भवन,सावंतवाडी येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन मंडळाचे अध्यक्ष दत्तप्रसाद अरविंदेकर,भंडारी पतपेढीचे चेअरमन गुरूदास पेडणेकर,महिला अध्यक्षा सौ.शीतल नाईक, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे सावंतवाडी तालुका सल्लागार सुधीर पराडकर,सचिव दिलीप पेडणेकर, उपाध्यक्ष देविदास आडारकर,हनुमंत…

Read Full News

संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीमध्ये आयोजित तीन दिवसीय भव्य ‘नाट्यमहोत्सवा’चा शानदार शुभारंभ…!

⚡सावंतवाडी ता.१७-: शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीमध्ये आयोजित तीन दिवसीय भव्य ‘नाट्यमहोत्सवा’चा शुभारंभ माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. शुभारंभाला ‘भगदत्त वध’ हे नाटक सादर करण्यात आले. याला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. येथील गोविंद चित्रमंदिरात या नाट्यमहोत्सवास प्रारंभ झाला. माजी उपनगराध्यक्ष श्री. पोकळे यांच्या उपस्थितीत या उत्सवास…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाला चालना…

कॉटेजेस उभारणीसाठी १५ कोटींचे अनुदान:सिंधुरत्न समृद्ध योजनेतून आंतरराष्ट्रीय दर्जाची कॉटेजेस; ४५ लाभार्थ्यांची निवड.. ⚡सावंतवाडी ता.१७-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी आणि स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘सिंधुरत्न समृद्ध योजना’ राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून आंतरराष्ट्रीय दर्जाची कॉटेजेस उभारण्यासाठी तब्बल १५ कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे….

Read Full News

घे भरारी फाउंडेशन – सावंतवाडी यांच्यावतीने आयोजित चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

⚡सावंतवाडी ता.१७-: नुकतेच शाळा नंबर -4 , सावंतवाडी या प्राथमिक शाळेमध्ये घे भरारी फाउंडेशन च्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले..या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच 15 ऑगस्ट 2025 रोजी सावंतवाडी प्राथमिक शाळा नंबर चार या ठिकाणी संपन्न झाला..इयत्तावार प्रत्येक गटातील यशस्वी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पारितोषिके देऊन घे भरारी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि सदस्यांच्या वतीने गौरविण्यात आले…

Read Full News

राकेश भगत याचे निधन…!

⚡मालवण ता.१७-:वायरी भूतनाथ येथील राकेश अरुण भगत (वय २७) या मच्छीमार तरुणाचे हृदयविकाराच्या धक्क्याने शुक्रवारी निधन झाले. राकेश भगत याच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्याला खासगी रूग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी कुडाळला नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. राकेश स्कुबा डायव्हींगमध्येही काम करायचा. त्याच्या अकाली जाण्याने कुटुंबियांसह मित्रपरिवाराला धक्का बसला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील,…

Read Full News

खासदार शाहू महाराज छत्रपती यांचे ऍड. अमृता मोंडकर व अरविंद मोंडकर यांनी मानले आभार…

⚡मालवण ता.१७-:कोल्हापूर येथे सर्किट खंडपीठाची स्थापना जलद गतीने व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करणारे कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांचे सिंधुदुर्ग जिल्हा वकील बार संघटनेच्या सदस्या व नोटरी वकील अॅड. अमृता अरविंद मोंडकर आणि जिल्हा काँग्रेस सरचिटणीस अरविंद मोंडकर यांनी भेट घेऊन आभार मानले. गेल्या अनेक वर्षांपासून सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील लोकांसाठी मुंबईला…

Read Full News

सिंधुदुर्गात येणाऱ्या दुग्धजन्य पदार्थाची तपासणी व्हावी – रमण वाईरकर…

⚡मालवण ता.१७-:चतुर्थी सणानिमित्त सिंधुदुर्गात येणाऱ्या दुग्धजन्य पदार्थाची तपासणी व्हावी, सिंधुदुर्गात कित्येक वर्षे तपासणी झालेली नाही. जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा समितीचे मालवण तालुकाध्यक्ष रमण वाईरकर यांनी सह. आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन यांच्याकडे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणपतीसाठी गणेशभक्त आवडीने खवा-माव्याचे पदार्थ अर्पण…

Read Full News

दहीहंडी स्पर्धेत जय हनुमान गोविंदा पथक, राजापूर यांनी प्रथम क्रमांक पटकावला…

भाजपच्या माध्यमातून संदीप गावडेंच आयोजन:सावंतवाडीकरांचा मोठा प्रतिसाद.. सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीच्यावतीने सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या भव्य दहीहंडी उत्सवाला सावंतवाडीकरांनी मोठा प्रतिसाद दिला. युवा नेते संदीप एकनाथ गावडे यांच्या संकल्पनेतून राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मैदानावर हा सोहळा पार पडला. या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि पालकमंत्री नितेश राणे…

Read Full News

ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी सुधीर धुरी यांची फेरनिवड…

⚡मालवण ता.१७-:ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी सुधीर धुरी यांची फेरनिवड. तसेच उपाध्यक्ष म्हणून संजय शेळके, तन्वीर खतीब तर सचिवपदी अर्जुन परब यांची निवड करण्यात आली आहे.राष्ट्रीय अध्यक्ष खंडूदेव कठारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसरकर, राष्ट्रीय निरीक्षक रामदास खोत, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुभाष कोठारी, उपाध्यक्ष लक्ष्मण दवणे, राज्य निरीक्षक घनःश्याम सांडीम यांच्या मार्गदर्शनानुसार कोकण विभागीय…

Read Full News

आचरा येथील रांगोळी स्पर्धेत दिव्या खोत, निधी राऊत, आदिती आचरेकर, नैना जाधव प्रथम…

⚡मालवण ता.१७-:न्यू इंग्लिश स्कूल आचरा तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा 8 वी ते 10 वी प्रथम गट तर 11 वी ते 12 वी कला आणि वाणिज्य, द्वितीय गट अशा दोन गटात घेण्यात आली. 8 वी ते 10 वी या प्रथम गटातप्रथम क्रमांक दिव्या किशोर खोत, निधी सुनील राऊत द्वितीय…

Read Full News

You cannot copy content of this page