राकेश भगत याचे निधन…!

⚡मालवण ता.१७-:
वायरी भूतनाथ येथील राकेश अरुण भगत (वय २७) या मच्छीमार तरुणाचे हृदयविकाराच्या धक्क्याने शुक्रवारी निधन झाले.

राकेश भगत याच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्याला खासगी रूग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी कुडाळला नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. राकेश स्कुबा डायव्हींगमध्येही काम करायचा. त्याच्या अकाली जाण्याने कुटुंबियांसह मित्रपरिवाराला धक्का बसला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण, भावोजी, काका असा परिवार आहे.

You cannot copy content of this page