आम. निलेश राणे यांनीही लुटला टेबलटेनिसचा आनंद..

⚡मालवण ता.०५-: महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग आयोजित महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र विभागीय टेबल टेनिस स्पर्धा २०२६ मालवणकुंभारमाठ येथील माघी गणेश मंगल कार्यालय येथे संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये महिला खुल्या गटामध्ये कोल्हापूरच्या निहाली पाटीलने तर पुरुष खुल्या गटामध्ये रायगडच्या प्रियांकुश भोसलेने विजेतेपद प्राप्त केले. तर रायगडचा दिव्यांग खेळाडू प्रमोदकुमार याने पुरुष खुल्या गटात अंतिम फेरीत धडक मारून सर्वांची वाहवा मिळवली.
या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनचे खजिनदार तथा कोकण-पश्चिम महाराष्ट्र विभागीय टेबलटेनिस स्पर्धेचे अध्यक्ष संजय कडू, विभागीय स्पर्धा आयोजक सचिव हेमंत वालकर, मॅनेजिंग कमिटी सदस्य तथा रत्नागिरी जिल्हा टेबलटेनिस असोसिएशनचे अध्यक्ष अजित गाळवणकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्गचे अध्यक्ष विष्णू कोरगांवकर, उपाध्यक्ष किरण पिंगुळकर, सहसचिव दीपक जाधव, विलास परुळेकर, दिलीप हुनारी, सतीश पिंगळे, पी. एस. शिंदे, नितीन तळेकर, पंकज पेडणेकर, गुरुनाथ राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेला आमदार निलेश राणे यांनी उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा देत स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल महासिंधू टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्गचे अभिनंदन केले. यावेळी आम. निलेश राणे यांनीही खेळाडूंसमवेत टेबल टेनिस खेळाचा आनंद घेतला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व तालुकाप्रमुख मंदार लुडबे उपस्थित होते.
हि स्पर्धा एकूण १४ गटांमध्ये स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेत कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या आठ जिल्ह्यांतील २४० खेळाडू सहभागी झाले. स्पर्धेस प्रशिक्षक, पालक तसेच क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : ११ वर्षांखालील मुले: विजेता – रणवीर जाधव (कोल्हापूर), उपविजेता- संयम चव्हाण (कोल्हापूर). ११ वर्षांखालील मुली: विजेती- श्रेया माईन (सातारा), उपविजेती- विभा घाडगे (सातारा). १३ वर्षांखालील मुले: विजेता- आरव सरदेशमुख (सातारा), उपविजेता-अक्षित ऐनापुरे (सोलापूर).१३ वर्षांखालील मुली: विजेती- श्रावणी माईन (सातारा), उपविजेती-समृद्धी मनवेलकर (कोल्हापूर). १५ वर्षांखालील मुले: विजेता- राजवीर साळोखे(कोल्हापूर), उपविजेता- जुनेद मगदूम(कोल्हापूर). १५ वर्षाखालील मुली: विजेती- गीत जगताप(कोल्हापूर), श्रावणी माईन(सातारा). १७ वर्षांखालील मुले : विजेता- वेदांत खालाडे (सोलापूर), उपविजेता- जुनेद मगदूम (कोल्हापूर). १७ वर्षांखालील मुली : विजेती- गीत जगताप (कोल्हापूर), उपविजेती- वर्षा परुळेकर (सिंधुदुर्ग). १९ वर्षांखालील मुले : विजेता- वेदांत खालाडे (सोलापूर), उपविजेता- अवधूत चौधरी (सोलापूर). १९ वर्षांखालील मुली : विजेती- अनन्या जोशी (कोल्हापूर), उपविजेती- निहाली पाटील (कोल्हापूर). खुला गट पुरुष: विजेता – प्रियांकुश बोस (रायगड), उपविजेता- प्रमोद कुमार (रायगड). खुला गट महिला: विजेती – निहाली पाटील (कोल्हापूर), उपविजेती- अनन्या जोशी (कोल्हापूर).
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना संजय कडू, हेमंत वालकर, विष्णू कोरगावकर, रुजारिओ पिंटो, दिलीप हुनारी, महेश तळवडेकर, किरण पिंगुळकर, मंदार लुडबे, नितीन तळेकर यांच्या हस्ते रोख रकमेची पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात आले. सदर रोख रक्कमेची पारितोषिके दत्ता सामंत यांनी व चषक मंदार ओरसकर यांनी पुरस्कृत केले होते.
या स्पर्धेसाठी आमदार रवींद्र चव्हाण, दत्ता सामंत, मंदार लुडबे, संजय लुडबे, जयंत गवंडे, जानकी मंगल कार्यालय, प्रांजल होमस्टे, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक, जीएसटीपीए महाराष्ट्र, साना होम्स प्रायव्हेट लिमिटेड, चिरंजीव प्रॉडक्ट, कोरगांवकर मालवण टेबल टेनिस अकॅडमी, महेश तळवडेकर, रुजारिओ पिंटो, डॉ. संजय पाटील यांचे योगदान लाभले.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विलास परुळेकर, चंद्रकांत साळवे, गुरुनाथ राणे, दिलीप हुनारी, पंकज पेडणेकर यांचे सहकार्य लाभले. मुख्य पंच म्हणून रोहित शिंदे, तंत्रज्ञ म्हणून सतीश पिंगळे तर पंच म्हणून पराग अंकोलेकर व गोपाळ बावसकर यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन डी. डी. जाधव यांनी केले तर आभार हेमंत वालकर यांनी मानले.
