Headlines

लायन्स क्लब मालवणतर्फे दांडी शाळेत दंतचिकित्सा शिबिर संपन्न

मालवण (प्रतिनिधी)

सेवा सप्ताहाच्या निमित्ताने लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने पुर्ण प्राथमिक शाळा दांडी मालवण येथे पहिली ते सातवीच्या मुलांसाठी दंतचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी दंतचिकित्सक डॉक्टर जुई देसाई यांनी मुलांची दंतचिकित्सा केली तसेच मार्गदर्शन केले.

यावेळी लायन क्लब मालवण अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, खजिनदार राधिका मोंडकर, झोन चेअरमन अनुष्का चव्हाण, जयश्री हडकर, उपाध्यक्ष मनाली दळवी, वैशाली शंकरदास, नंदिनी गावकर, गणेश प्रभुलकर, महेश अंधारी, रुजरीओ पिंटो, उमेश शिरोडकर, राजा शंकरदास यांसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page