Headlines

बांदा सटमवाडी येथे एका खासगी कंपनी कडून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड…

रियाज खान यांचा गंभीर आरोप: तात्काळ चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा ठाकरे सेना धरणे आंदोलन करणार.. ⚡बांदा ता.२५-: बांदा सटमवाडी येथे एका खासगी कंपनीने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केल्याचा गंभीर आरोप ठाकरे युवासेना गटाचे उपतालुका प्रमुख रियाज खान यांनी केला आहे. कंपनीने कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता वृक्षतोड केली असून, तोडलेल्या झाडांच्या ठिकाणी पुनर्लागवडही केलेली नाही,…

Read Full News

झोळंबे येथील पैठणीच्या खेळात प्रियांका परब ठरल्या विजेत्या…

⚡बांदा ता.२५-: नवरात्रौत्सव निमित्ताने श्रीदेवी माऊली मंदिर झोळंबे येथे आयोजित पैठणीच्या खेळात प्रियांका परब यांनी प्रथम क्रमांकाची मानाची पैठणी मिळवली. शालन गवस हिने द्वितीय, तर सिध्दी गवस हिने तृतीय क्रमांक पटकावला.पदवीधर शिक्षिका व सेवानिवृत्त केंद्रप्रमुख संदीप गवस यांच्या आयोजनातून माऊली मंदिराच्या सभामंडपात तब्बल सहा तास रंगलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन देवस्थान कमिटी अध्यक्ष शंकरराव गवस, सरपंच…

Read Full News

विकास सावंत यांनी चालवलेला वारसा विक्रांत सावंत निश्चितच पुढे नेतील…

आम. दीपक केसरकर:सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दिल्या शुभेच्छा.. ⚡सावंतवाडी ता.२५-: सिंधुदुर्गच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्व. भाईसाहेब सावंत आणि स्वर्गीय विकास सावंत यांनी चालवलेला वारसा विक्रांत सावंत निश्चितच पुढे नेतील अशा शुभेच्छा माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विक्रांत सावंत यांना दिल्या. आमदार केसरकर यांनी आज…

Read Full News

जागतिक औषध निर्माता दिनानिमित्त कणकवलीत सामाजिक उपक्रम…

कणकवली : जागतिक औषध निर्माता दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, तालुका शाखा कणकवलीतर्फे उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या वेळी अपघात विभागासाठी फ्रिज भेट देण्यात आला तसेच रुग्णालयात दाखल रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाबद्दल वैद्यकीय अधीक्षकांनी संघटनेचे मनःपूर्वक आभार मानले आणि फार्मासिस्ट दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास…

Read Full News

जैवविविधता आणि पर्यावरण यांचं अतूट असे नातं…

सुहास वायंगणकर:वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे व्याख्यान संपन्न.. ⚡मालवण ता.२५-:जैवविविधता आणि पर्यावरण यांचं अतूट असे नातं आहे. दोघांचेही योग्य जाणीव आणि संवर्धन हेच आपल्या भविष्याचं खरे रक्षण आहे.आज पर्यावरणचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असल्याने आपण जर जैवविविधता आणि पर्यावरणाबद्दल सजग राहिलो, तरच आपली पृथ्वी सुंदर, समृद्ध आणि आरोग्यदायी राहील. प्रत्येकाने आपापल्या पातळीवर जबाबदारी…

Read Full News

सावंतवाडी येथील भजन स्पर्धेत पिंगुळीचे रवळनाथ प्रासादीक भजन मंडळ प्रथम…

कलंबिस्तचे स्वामी समर्थ भजन मंडळ द्वितीय तर नेरुरचे मोरेश्वर भजन मंडळ तृतीय.. सावंतवाडी शहरातील बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेत पिंगुळीच्या श्री देव रवळनाथ प्रासादीक भजन मंडळ ( बुवा रूपेश यमकर ) याने प्रथम क्रमांक पटकाविला. या भजन स्पर्धेत कलंबिस्तच्या श्री स्वामी समर्थ प्रासादीक भजन मंडळ ( बुवा संतोष धर्णे )…

Read Full News

हत्ती सुरक्षित राहू शकतील यासाठी वनतारा’ बाबत भूमिका मी मांडली…

आमदार दीपक केसरकर:गोवा सरकारनं हत्तीला आपल्याकडे ठेवाव, माझा विरोध नाही. पण, स्थानिक शेतकऱ्यांना त्रास होऊ नये हीच अपेक्षा.. ⚡सावंतवाडी ता.२५-: वनतारा’मध्ये योग्य ती काळजी घेतली जाते असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. हत्ती विकला कुठे जातो, तो प्रश्नच नाही. प्राण्यांना पकडण्यासाठीची योजना त्यांच्याकडे आहे हे समोर आले आहे. हत्तीबाधीत शेतकऱ्यांच दुःख मी समजू शकतो. त्या हत्तींना…

Read Full News

सर्व मुलं जर्मनीत जाण्यासाठी आपण प्रयत्न करू…

आमदार दीपक केसरकर:काही लोकांनी मुलांच्या मनात गैरसमज निर्माण केलेत.. ⚡सावंतवाडी ता.२५-: महाराष्ट्र शासनाचा आणि बेडन युटनबर्ग जर्मनी राज्याचा करार आदर्शवत आहे. या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळणार आहे‌. मी शिक्षणमंत्री असेपर्यंत या योजनेला गती दिली होती‌. आता या योजनेस होणारा विलंब बघून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला समन्वयक म्हणून लक्ष देण्यासाठी त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर…

Read Full News

पणजीत उमटला डिजिटल लोकशाहीचा आवाज, तरुण तज्ज्ञ आणि नेत्यांचा सहभाग…

⚡पणजी दि.२५- : गोव्यात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या डिजिटल डेमॉक्रसी डायलॉग (D3) चे आयोजन करण्यात आले. या परिषदेत नेते, तज्ज्ञ, निर्माते आणि तरुणांचा सहभाग होता. डिजिटल सशक्त आणि सर्वसमावेशक भविष्याची दिशा ठरवण्यात आली. या कार्यक्रमात तंत्रज्ञान लोकशाहीला बळकटी देऊन नागरिकांना शासनाशी जोडू शकते, तसेच नवोन्मेष, संस्कृती आणि…

Read Full News

रस्त्यांवर पडलेले खड्डे तात्काळ भरून काढणार…

आमदार दीपक केसरकर: इलेक्शन आल्यावर काही लोक लहान लहान गोष्टीवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतील, विरोधकांना टोला.. ⚡सावंतवाडी ता.२५-: इतर मतदारसंघापेक्षा सावंतवाडी मतदारसंघातील रस्त्याची अवस्था चांगली आहे. तालुक्यातील रस्त्यांवर खड्डे पडलेत ते खड्डे भरून काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु काही रस्त्यांवर वारंवार खड्डे पडत असल्याने आपण संबंधित कॉन्ट्रॅक्टरावर नोटीस काढण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती…

Read Full News

You cannot copy content of this page