रियाज खान यांचा गंभीर आरोप: तात्काळ चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा ठाकरे सेना धरणे आंदोलन करणार..
⚡बांदा ता.२५-: बांदा सटमवाडी येथे एका खासगी कंपनीने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केल्याचा गंभीर आरोप ठाकरे युवासेना गटाचे उपतालुका प्रमुख रियाज खान यांनी केला आहे. कंपनीने कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता वृक्षतोड केली असून, तोडलेल्या झाडांच्या ठिकाणी पुनर्लागवडही केलेली नाही, असे खान यांनी उपवनसंरक्षक सावंतवाडी यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
या संदर्भात त्यांनी प्रशासनाला इशारा देत ८ दिवसांच्या आत वृक्षतोडीची संपूर्ण चौकशी करून, किती झाडे तोडली गेली याची माहिती जाहीर करावी आणि संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी व दंड वसूल करावा अशी मागणी केली आहे. अन्यथा शिवसेना उबाठाच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडेल, असा इशाराही खान यांनी दिला आहे.
यावेळी सागर धोत्रे, श्रीकांत धोत्रे, निशांत तोरस्कर, साहिल खोबरेकर, संजय बांदेकर आदी उपस्थित होते.
